वीजचोरांनी कारवाईत अडथळे आणल्यास गुन्हे दाखल करु !

महावितरणचा इशारा
File Photo
File Photo

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

मीटरमध्ये फेरफार (meter change) किंवा आकडे टाकून वीजचोरी (vejchori) करणार्‍यांविरोधात महावितरणची (Mahadistributor) धडक मोहीम (Dhadak campaign) सुरू आहे. या कारवाईत अडथळे आणणार्‍या तसेच वीजचोरीची बिले (vijchorichi bile) न भरणार्‍या ग्राहकांवर (customer) थेट पोलिसांत गुन्हे (police crime) दाखल करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. अखंडित वीजपुरवठ्यासाठी ग्राहकांनीही सहकार्य करावे. तसेच अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

File Photo
Photos # दूध संघासाठी अडीच लाखापर्यंत पोहोचला फुलीचा भाव

वीजचोरी रोखण्याच्या महावितरणच्या मोहिमेचा भाग म्हणून राज्यात सर्वाधिक वीज गळती असलेले 230 फीडर निश्चित करण्यात आले आहेत. फीडरवरून दिली गेलेली वीज आणि संबंधित ग्राहकांच्या मीटरवर नोंद झालेला विजेचा वापर यांची पडताळणी करून वीजगळती निश्चित केली जाते. मुख्यतः वीजचोरीमुळे तूट वाढते. या 230 फीडरमध्ये जळगाव शहरातील विठ्ठलपेठ फीडरचा समावेश आहे. या फीडरवर जोडलेल्या घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांच्या वीज वापरावर महावितरणच्या अधिकार्‍यांनी लक्ष केंद्रित केले.

File Photo
VISUAL STORY: अशी होती एक ‘लावणीसम्राज्ञी’

संबंधित ग्राहकांच्या मीटरमध्ये अचूक रिडिंग येत आहे का, मीटरमध्ये फेरफार केला आहे का, कोठे आकडा टाकून वीजचोरी होत आहे का याची माहिती महावितरणच्या कर्मचार्‍यांनी काढली व 21 नोव्हेंबरला मोहीम हाती घेऊन कारवाई केली. त्यात 52 जणांची वीजचोरी पकडण्यात आली तर 212 आकडे काढण्यात आले.

File Photo
Visual Story # नुसरतच्या या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर घातलीय धुमाकूळ
File Photo
Visual Story : ड्रिम गर्लने दिल्या तीच्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

या ग्राहकांना वीजचोरीची रीतसर बिले देण्यात आली. मात्र अनेक ग्राहकांनी बिले न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी 9 डिसेंबर रोजी महावितरणच्या जोशीपेठ कक्षाचे सहायक अभियंता उमाकांत पाटील व सहकारी पोलिस कर्मचार्‍यांना सोबत घेऊन गेले. मात्र जमावाने त्यांना घेराव घातला होता.

File Photo
श्रध्दांजली :  शालीन आणि लाघवी गायिका काळाच्या पडद्याआड
File Photo
VISUAL Story: अभिनेत्री मृणाल ठाकूरचा बॉसी अवतार पाहाल तर प्रेमातच पडाल !
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com