साहेबांनी आदेश दिला तर खडसेंना मतदान!

आ.चंद्रकांत पाटलांचे ‘देशदूत’शी बोलताना प्रतिपादन
साहेबांनी आदेश दिला तर खडसेंना मतदान!

जळगाव jalgaon। रवींद्र पाटील

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी (Assembly election battle) सुरु असतानाच अपक्ष आमदारांना (Independent MLAs) कधी नव्हे एवढा मान मिळत आहे. महाविकास आघाडी असो वा भाजपा (Mahavikas Aghadi or BJP) त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न करीत असतानाच मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार, (Independent MLA of Muktainagar,) शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (Shiv Sena district chief Chandrakant Patil) चंद्रकांत पाटील हेसुध्दा मुंबईत आहेत. त्यांच्या मतदानाविषयी जिल्ह्यात तर्क-वितर्क लढविले जात असतानाच मातोश्रीवरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेबांनी (Chief Minister Uddhav Thackeray) आदेश दिल्यास एकनाथराव खडसेंना आपण मतदान करु, (We will vote for Eknathrao Khadse,) असे सांगत आ.चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी या निवडणुकीत नवीन ट्विस्ट निर्माण केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे अनेकांचे डोळे विस्फारण्याची शक्यता आहे.

विधान परिषद निवडणुकीसंदर्भात आ. चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही महाविकास आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेससह सत्तेत आहोत. या महाविकास आघाडीसाठी शरद पवार साहेब व उध्दव ठाकरे साहेबांनी अशक्य ते शक्य करीत भाजपाला धडा शिकवित सत्ता स्थापन केली.आता विधान परिषद निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपले उमेदवार दिले असले तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथराव खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. मी अपक्ष आमदार असलो तरी शिवसेनेच्या विचाराने वाढलो आहे.

त्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितल्यास एकनाथराव खडसेंनादेखील मतदान करेल; त्यात आश्चर्य वाटायचे कारण नाही. आम्ही शिवसेनेचे शिलेदार असून आमच्या नेत्यांनी ज्या उमेदवाराला मतदान करायचे सांगितले, त्याला मतदान केले जाईल. खडसे व माझे जमत नसले तरी साहेबांनी सांगितले तर आपले मतदान खडसेंनाच होईल, असे स्पष्ट करीत त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याचे स्पष्ट केले आहे.

मुक्ताईनगर मतदारसंघात दोघांमध्ये साप-मुंगुसाचे नाते

आ. चंद्रकांत पाटील व एकनाथराव खडसे महाविकास आघाडीत एकत्र असले तरी मुक्ताईनगर मतदारसंघात या दोघांमध्ये साप-मुंगुसाचे नाते असल्याचा अनुभव अनेकवेळा आला आहे. खडसे भाजपात असताना युतीच्या काळातदेखील या दोघांचे वैर सर्वश्रुत आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपाने खडसेंचे तिकीट कापत त्यांच्या कन्या रोहिणी यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा पराभव करीत चंद्रकांत पाटील आमदार झाले. शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले, त्याचवेळी खडसेंनीदेखील भाजपाला रामराम करीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे दोघे राजकीय वैरी पुन्हा सत्तेत समोरा-समोर आले. त्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीतदेखील खडसेंच्या उमेदवारीने आ. चंद्रकांत पाटील यांच्या मताला मोठी किंमत आली आहे.

मी विधिमंडळात येणारच! मी विधिमंडळात येऊच नये असा काहींचा प्रयत्न होता. कारण मी तिथे येऊन बोललो तर काहींना अडचणीचे ठरणार आहे. मात्र पक्षाने मला संधी दिली आहे. मी विधिमंडळात परत येणारच, असा विश्वास विधान परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला. राज्यसभा निवडणुकीत वेगळे गणित होते. भाजपकडे तेव्हा जास्तीची मते होती. मात्र आता शिवसेना वगळता कोणत्याही पक्षाकडे अतिरिक्तची मते नाहीत. त्यामुळे भाजपसाठी निवडणुकीचे गणित सोपे नाही. या निवडणुकीत आघाडीचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्वास एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com