इंस्टाग्रामची ओळख, अल्पवयीन तरुणीवर बलात्कार

चाळीसगाव पोलिसात तिघांविरोधात गुन्हां दाखल
इंस्टाग्रामची ओळख, अल्पवयीन तरुणीवर बलात्कार

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी -

मोबाईल इंस्टाग्राम (Instagram) वरून ओळख (identity) करुन, एक सोळा वर्षीय तरुणीवर (young woman) तरुणाकडून (youth) बलात्कार (rape) करण्यात आला आहे. हि घटना दि,२२ रोजी घडली असून याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला (Chalisgaon Police Station) गुन्हां दाखल (Cases filed) करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहरातील एका सोळा वर्षीय अल्पवयीन तरुणीची इंस्टाग्रामच्या माध्यमातून नांदगाव येथील नाना गोरख अहिरे या तरुणाची ओळख झाली. या ओळखीनंतर सदर तरुणीचे हात मजुरी करणारे वडील आणि दोन्ही भांडी करणारी आई जेव्हा जेव्हा कामासाठी घराबाहेर पडायची तेव्हा तेव्हा इंस्टाग्रामच्या माध्यमातून या दोघांची चॅटिंग आणि फोनवर बोलणे चालायचे, अशातच नाना अहिरे हा गेल्या २१ सप्टेंबर रोजी अचानक नांदगाव येथून मित्रा समवेत चाळीसगाव आला, आणि त्याने सदर तरुणीला मला तुला भेटायचे आहे असे सांगून त्याने तिला येथील मुसा कादरी दर्गा परिसरात बोलावले.

सायंकाळी सव्वा पाच वाजता सदर तरुणी ही नाना अहिरे याला भेटण्यासाठी गेली असता, त्याने एकांतात बोलण्याचा बहाना करीत अन्य मित्राला दर्ग्याच्या परिसरात सोडत दुसर्‍या मित्रासोबत पल्सर गाडीवरून सदर तरुणीला औरंगाबाद रस्त्यावर नेत एका शेताजवळ उतरवून त्याने मक्याच्या शेतात नेत तिच्यावर दोन वेळा संबंध केलेत आणि घरी गेल्यानंतर कोणास काही सांगितले तर मारून टाकण्याची धमकी देखील दिली.

रात्री दहा वाजता नाना अहिरे यांनी पुन्हा मित्रांना फोनवरून औरंगाबाद रस्त्यावर बोलावले नाना याने सदर तरुणीला पुन्हा दर्ग्याजवळ सोडले सदर तरुणी घरी उशिरा आली, तिचे आई-वडिलांनी तिला इतक्या वेळ कुठे गेली होती. याबाबत विचारणा करता तिने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला सोबत घेऊन शहर पोलीस स्टेशन गाठले सदर अल्पवयीन तरुणीच्या तक्रारीवरून कलम ३७६ पोस्को नुसार गुन्हा दाखल करून तिघांना नांदगाव येथे जाऊन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मोबाईल हा आजच्या पिढीची सर्वाधिक गरज बनला आहे त्याचे फायदे अनेक असले तरी त्याचा दुरुपयोग हा तरुण पिढीसाठी सर्वनाश करणारा ठरत आहे इंस्टाग्राम नावाचा जो प्रकार आहे, तो तरुण पिढी बरबाद करणाराच सर्वाधिक ठरत आहे. यामुळे अनेक तरुण-तरुणींचे आयुष्य देखील बरबाद झाल्याच्या घटना उघडकीस येत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com