आगीत उद्धवस्त कुटुंबाला लाखांची मदत

केसुला व जन्मभूमी फाउंडेशनचा आदर्श उपक्रम
आगीत उद्धवस्त कुटुंबाला लाखांची मदत

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील राजदेहरे (Rajdehre) येथील वनिता चव्हाण यांचे घर अचानक लागलेल्या आगीत पूर्णता; जळून खाक झाले होत. अचाकन घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले होते. या कुटुबाच्या मदतीला केसुला फाउंडेशन नाशिकचे (Kesula Foundation Nashik) खजिनदार जन्मभूमी राजदेहरेचे संस्थापक प्रा.दिनेश राठोड धावून आलेत. त्यांनी (Social media) सोशल मीडियाच्या माध्यमातून (video) व्हिडिओ प्रसारित केला, त्या माध्यमातून समाजातून केलेल्या आव्हानाला उदंड प्रतिसाद मिळाला. आणि १ लाख रुपयांची मदत मिळवून दिली. यातून केसुला व जन्मभूमी फाउंडेशनने समाजकारणाच्या माध्यमातून माणुसकी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

सध्याच्या स्वार्थी अन् घाणेरडे राजकारण पाहता सामान्यांकडे शासनाचे लक्ष जाणे दुरापास्तच झाले आहे. आशावेळी केसुला फाऊंडेशन नाशिकने आवाहन करीत सदर महिलेस लाखो रुपयाची मदत मिळाली आहे.

केसुलाच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. तूषार राठोड, डॉ. तानाजी चव्हाण, जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष लक्ष्मण राठोड, नासिकचे नगरसेवक योगेश हिरे, आश्रम शाळा शिक्षक वृंद राजदेहरे, शिवाजी पाटील मित्र मंडळ, मुंदखेडे, सौ चित्राताई महिला मंडळ, रमेश गुंजाळ आदींनी घरासाठी पत्रे, अँगल, कपडे, धान्य, किराणा, आंथरून-पांघरून व बकर्‍यांचा समावेश आहे. सदर महिलेच्या गावी भेट देत केसुला फाऊंडेशन नाशिकचे अध्यक्ष तथा लेखक सलतान राठोड, उपाध्यक्ष प्रकाश राठोड, खजिनदार दिनेश राठोड, सचिव मोतीलाल राठोड, संचालक नानाभाऊ राठोड, संतोष राठोड, ईश्वर राठोड यांनी सदर महिलेकडे वस्तू व रोख रक्कम भेट दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com