जीना मरना तेरे संग.....

आजाराने पत्नीचा मृत्यू... पतीनेही गळफास घेवून संपविले जीवन
जीना मरना तेरे संग.....

जळगाव - jalgaon

आजाराने उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाल्याने...तिच्या मृत्यूच्या धसक्याने पतीनेही गळफास घेवून जीवन संपविल्याची घटना जळगावातील रामेश्‍वर कॉलनीत सोमवारी सकाळी घडली. मिराबाई अरुण सोनवणे वय ४२ असे मयत महिलेचे तर अरुण खंडू सोनवणे वय ४७ असे मयत पतीचे नाव आहे. या घटनेने जीना मरना तेरे संग या गीताप्रमाणे जीयेंगे भी साथ साथ और मरेंगे भी साथ साथ या चित्रपटाप्रमाणे गीताचा प्रयत्य आला आहे.

अरूण खंडू सोनवणे रा. लाडली ता. धरणगाव ह.मु. नागसेन नगर, रामेश्वर कॉलनी हे पत्नी मीराबाई आणि मुलगा अनिकेत यांच्यासह राहत होते. जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत हमालीचे काम करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची पत्नी मिराबाई सोनवणे ह्या दुर्धर आजार जडला होता. त्यांनी काही दिवसांपुर्वी मुंबई येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अनिकेत होता.

दरम्यान, ३१ ऑक्टोबर रोजी मीराबाई सोनवणे यांचा मुंबईत खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. त्यावेळी अरूण सोनवणे हे जळगावात राहत्या घरी एकटेच होते. पत्नी मिराबाईच्या मृत्यूचे दुःख झाल्याने तसेच धसका घेवून घरी एकट्या अरुण सोनवणे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. सोनवणे यांचे लहान भाऊ सुनिल सोनवणे हे घरात आवराआवर करण्यासाठी सोमवारी सकाळी १० वाजता अरूण सोनवणे यांच्या घरी गेले असता प्रकार समोर आला.

मयताच्या पश्चात आई सरूबाई, वडील खंडू सोनवणे, तीन भाऊ, सपना आणि अर्चना दोन विवाहित मुली आणि मुलगा अनिकेत असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान पती पत्नीच्या मृत्यूच्या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत असून मुलगा अनिकेत याचे एकाचवेळी मातृ व पितृछत्र हरविले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com