डाकू आमदाराला तीस वर्ष कसे काय निवडून दिले?

डाकू आमदाराला तीस वर्ष कसे काय निवडून दिले?

वरणगाव फॅक्टरी Varangaon factory ( वार्ताहर )

मला जर शिवसेनेचे (Shiv Sena) पालक मंत्री(Guardian Minister) डाकू म्हणत असतील तर डाकू आमदाराला (bandit MLA) तीस वर्ष कसे काय निवडून (choosing) दिले असा खोचक सवाल माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांनी वरणगाव येथे बोलतांना केला.

वरणगाव येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) परिसंवाद (Seminar) मेळाव्यात ते बोलत होते. लोकनेते नाथाभाऊ व ना. गुलाबराव पाटील यांच्यामधील तणावाची दरी अधिक निर्माण झाल्याचे यावेळी निदर्शनात आले.

एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांनी सांगितले की बोदवड (Bodwad) नगरपरिषद (Municipal Council) निवडणुकीत छुपी युती झाली होती, परिसरातील करोडो रुपयाची विकास कामे माझ्या कारकीर्दीत झाले असून अनेक लोक त्याचे उद्घाटन करीत आहेत. गुलाबराव पाटलांच्या (Gulabrao Patil) नावाची सुरूवातच कशी आहे हे आपणास चांगले ठाऊक आहे, जर मला शिवसेनेचे नेते डाकू (bandit MLA) म्हणत असतील तर डाकू व्यक्तीला तीस वर्ष निवडून (elect) कसे दिले असा खोचक सवालही त्यांनी गुलाबराव पाटील यांना केला. नगरपालिकेत (Municipal Council) सत्ता मिळवायची असेल तर जोमाने काम करावे लागेल, चुगलखोरापासुन दूर रहा असे खडसे यांनी सांगितले.

याप्रसंगी व्यासपीठावर यावेळी भुसावळ तालुक्याचे माजी आमदार संतोष चौधरी , राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैया पाटील , जिल्हा परिषद सदस्य रविद्र पाटील , वंदना ताई पाटील , बरकत अली , भरत पाटील , सतीष घुले , प्रा जतिन मेढे , उमेश नेमाडे ,राजेंद्र चौधरी , सुधाकर जावळे , विष्णू खोले , बबलू माळी , रविंद्र सोनवणे , गणेश चौधरी , समाधान चौधरी , तालुका अध्यक्ष दिपक मराठे , गोगा शेठ , लड्डा शेठ , साजीद कुरेशी , माजी नगराध्यक्षा अरुणाताई इंगळे , प्रतिभा तावडे , रंजना पाटील , रोहीणी जावळे , महेबुब पठाण , मझर पठाण आदी मान्यवर उपस्थित होते .


राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी नगरपालिकेत (Municipal Council)राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असे सांगितले. तर भुसावळचे माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांनी वरणगाव चे लोक हे सुज्ञ असून राष्ट्रवादीच्या पाठीशी आहेत असे सांगितले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जि. प. सदस्य रवींद्र नाना पाटील ,जतीन मेढे ,मझहर पठाण ,राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष वंदनाताई चौधरी, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विविध शाखा व पदाधिकाऱ्यांचे नेमणूक पत्र सुद्धा मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले तसेच अनेक युवकांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान चौधरी यांनी केले, सूत्रसंचालन वाय. आर. पाटील यांनी केले . तर आभार महेश सोनवणे यांनी मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com