
जरंडी jarndi
सोयगाव सह तालुक्याला शुक्रवारी रात्री अचानक चक्री वादळी (Cyclone gale) वाऱ्याने तडाखा () दिला यामध्ये रामपुरा तांड्यात रात्री रामसिंग दल्लू राठोड यांचे घर कोसळून (house collapsed)जमीनदोस्त झाल्याची घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजता घडली.
घरातील कुटुंब झोपेत असतांना अचानक चक्री वादळाचा तडाख्यात घर पत्त्यप्रमाणे कोसळताच घरातील खडबडून जागे झालेल्या सदस्यांनी घराच्या बाहेर पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला आहे याप्रकरणी शनिवारी महसूल विभागाने घटनेच्या पंचनामा केला आहे घटनास्थळी बहुलखेडा सज्जा च्या तलाठी शिला मोरे यांनी तातडीने भेट देऊन घटनेचा अहवाल सोयगाव तहसील कार्यालयात दिला आहे...
सोयगाव तालुक्याला शुक्रवारी रात्री अचानक चक्री वादळाचा तडाखा बसला होता या तीन तासांच्या या वादळात तीन तास या वादळ च्या तडाख्यात रस्ता दुतर्फा झाडे कोसळून पडली आहे जरंडी गावात वीज रोहित्रावर झाड कोसळल्या ची घटना घडली आहे त्यामुळे रात्रभर वीज पुरवठा खंडित झाला होता
सोयगाव तालुक्याला रात्री अकरा वाजेनंतर अचानक चक्री वादळी वाऱ्याचा तडाखा बसला या चक्री वादळ च्या तडाख्यात तालुक्यातील निंबायती जरंडी माळेगाव पिंपरी बहुलखेडा कवली निमखेडी उमर विहिरे घोसला नांदगाव तांडा या गावातील ३१ घरांवरील पत्रे उडाली आहे त्यामुळे रात्रीच्या अंधारात पत्रे उडालेल्या कुटुंबीयांना अंधारात उघड्या वर रात्र काढावी लागली होती दरम्यान चक्री वादळ च्या तडाख्यामुळे जरंडी उपकेंद्रा अंतर्गत असलेल्या गावांचा वीज पुरवठा रात्रभर खंडित झाला होता उन्हाळी पिकांना या चक्री वादळ चा फटका बसलेला आहे.रात्री उशिरापर्यंत चक्री वादळी वाऱ्याचा तडाख्यात झालेल्या नुकसानी ची आकडेवारी हाती आलेली नव्हती.