चक्क ....हॉटेलात वेश्या व्यवसाय

एमआयडीसी पोलिसांचा छापा ; हॉटेल मालकासह तिघे अटकेत
चक्क ....हॉटेलात  वेश्या व्यवसाय
USER

जळगाव jalgaon

शहरातील जळगाव-औरंगाबाद रोडवरील अमरनाथ हॉटेलात (Amarnath Hotel) सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitution) एमआयडीसी पोलिसांनी (MIDC police) सोमवारी पर्दाफाश केला आहे याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी हॉटेल मालकासह तीन जणांना अटक (Arrested) केली आहे.

जळगाव औरंगाबाद महामार्गावर असलेल्या अमरनाथ हॉटेलमध्ये बेकायदेशीररित्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राहुल रगडे, आशा पांचाळ, सुनिल पाटील, किरण धमके, चंद्रकांत चिकटे, संतोष जाधव, रविंद्र सुरळकर, रविंद्र कारंकाळ, मिलींद पाटील यांच्या पथकासह सोमवारी सायंकाळी ६ वाजता अमरनाथ हॉटेलमध्ये छापा टाकला.

याठिकाणी सात ते आठ जण महिलांसोबत आढळून आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी यांच्या फिर्यादीवरून हॉटेल मालक शंकर दुलाराम महाजन वय ४१ रा. हनुमान नगर, जळगाव, ग्राहक राजेश मिठाराम ठोंबरे आणि विकास रमेश सोनवणे यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तिघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com