कासोदा आडगाव रस्त्यावर भीषण अपघात ; चालक गंभीर

कासोदा आडगाव रस्त्यावर भीषण अपघात ; चालक गंभीर

कासोदा - वि. प्र. kasoda

कासोदा-आडगाव रस्त्यावर आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास कासोदयाकडून आडगावकडे जाणाऱ्या (Indica) इंडिका गाडी नंबर MH - 47, N -28 17 ला जबर अपघात (accident) झाला असून, गाडी चालक ज्ञानेश्वर राठोड (वय अंदाजे 35) जखमी झाला. सदर ड्रायव्हर हा (chalisgaon) चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड तांडा येथील आहे. त्याला तात्काळ (Ambulance) 108 ने जळगावला पाठविण्यात आले.

गाडी चालक हा एकटाच होता. गाडी भरधाव वेगात होती. आडगाव कासोदा रस्त्यावरील पाटचारी पुढे रमेश हरी पाटील यांच्या शेताजवळ गाडी झाडावर जाऊन आदळली. यामुळे सदर अपघात झाला.

चालक हा गाडीत अडकलेला होता. त्याला काच फोडून बाहेर काढण्यात आले. त्यासाठी लुनेश्वर भालेराव, यु.टी.महाजन सर, आडगाव ग्रा.पं सदस्य अनिल पाटील (पिंटू मिस्तरी) आडगावचे गोपाल सोनवणे, शुभम पाटील, मंगेश ठाकूर, रवि सोनवणे, गणेश पाटील, नंदू मोहिते इत्यादींनी तात्काळ मदत केली.

सदर घटनेचे वृत्त कासोदा (police) पोलीस स्टेशनच्या (api) एपीआय सौ.कायटे मॅडम यांना कळवल्या नंतर त्यांनी तात्काळ पी.आय. श्री.ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. शिवारातील आजूबाजूचे शेतकरी तात्काळ मदतीला धावून आले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com