बोदवड तालुका वकील संघाच्या कार्याचा गौरव

जलद न्यायासाठीच लोक अदालत-न्यायाधीश सरवरी
बोदवड तालुका वकील संघाच्या कार्याचा गौरव

बोदवड - प्रतिनिधी bodwad

बोदवड तालुका वकील संघाने (Taluka Vakil Sangh) यशस्वीपणे राबविलेल्या लोक अदालतीच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा न्यायाधीश (District Judge) यांचेमार्फत पाठवलेले पत्र व स्मृतिचिन्ह बोदवड न्यायालयाचे न्यायाधीश शर्वरी यांचे मार्फत बोदवड तालुका वकील संघास देण्यात आले.

दि.12 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीचा अहवाल आणि अॅड.अर्जुन पाटील अध्यक्ष व तालुका वकील संघ, तालुका विधी सेवा समितीच्या कार्यालयाने पॅन इंडिया (31 ऑक्टोबर 2022 ते 13 नोव्हेंबर 2022) अंतर्गत आउटरीच जनजागृती कार्यक्रमांबाबत सादर केलेली सांख्यिकीय आकडेवारी याची दखल घेऊन न्यायाधिश शेख, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि मुख्य प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जळगाव यांनी अध्यक्ष व बोदवड तालुका वकील संघ लोक अदालतिबाबत केलेल्या कार्याचा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या लोक अदालत विषय कार्यक्रमास दिलेला प्रामाणिक पाठिंबा आणि बार असोसिएशनने घेतलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करून आनंद व्यक्त केला आहे. त्याबाबतचे जिल्हा न्यायाधीश जळगाव यांनी प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह बोदवड न्यायालयाकडे पाठवले होते.

सदर प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह हे अध्यक्ष बोदवड तालुका वकील संघ व सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीत एका छोटेखानी कार्यक्रमात बोदवड न्यायालयाचे न्यायाधीश क्यू यु ए सारवरी यांनी अर्जुन पाटील अध्यक्ष बोदवड तालुका वकील संघा व वकील वर्गाच्या उपस्थितीत देण्यात आले.

यावेळी बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड.अर्जुन पाटील, उपाध्यक्ष अड. धनराज प्रजापति, अँड.पी.आर. मोझे अँड.आय डी पाटील, अॅड.के.एस.इंगळे यांचे सह सर्व सन्माननीय सदस्य वकील संघ बोदवड उपस्थित होते.

यावेळी सन्माननीय सदस्यांना मार्गदर्शन करताना बोदवड न्यायालयाचे न्यायाधीश शर्वरी यांनी सांगितले की. लोक अदालतीमुळेच लोकांना जलद त्वरित व स्वस्त न्याय मिळू शकतो. लोक न्यायालयाची ही संकल्पना अधिक लोकाभिमुख होण्याकरता सर्वांनी संयुक्त प्रयत्नाची गरज आहे. तसेच लोक अदालत यशस्वी करण्यासाठी वकील संघाच्या कार्याचाही न्यायाधीश यांनी गौरव केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com