निंबोल येथे सेवा समर्पण बहुउद्देशीय संस्थेमार्फत भूमिपुत्रांचा सन्मान

समाजपयोगी कार्य राबवून अल्पावधीत मिळवले फाउंडेशनने गावकऱ्यांच्या हृदयात स्थान
निंबोल येथे सेवा समर्पण बहुउद्देशीय संस्थेमार्फत भूमिपुत्रांचा सन्मान

रावेर|प्रतिनिधी raver

निंबोल (ता.रावेर) येथील सेवा समर्पण बहुउद्देशीय फाउंडेशन (Multipurpose Foundation) कडून गावातील विविध स्तरातील व्यवसाया निमित्ताने व नोकरीसाठी बाहेरगावी गेलेल्या भूमिपुत्रांचा सन्मान सोहळा आज दि.२५ रोजी संपन्न झाला.

निंबोल येथे माजी सैनिक वामनराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी भारत माता प्रतिमापूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष वामनराव पाटील, बलवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक एन.व्ही. पाटील यासह उपस्थित मान्यवरांनी केले.गावातील भूमिपुत्र व्यवसाय व नोकरीनिमित्ताने विविध शहरात राहत आहे.अशी हि मंडळी दिवाळीनिमित्त गावात आल्याने,त्यांचा गौरव व त्यांची ओळख नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात सेवा समर्पण फाउंडेशनकडून आयोजित केला होता.

यात ९० बाहेरगावी असलेले भूमिपुत्र उपस्थीत होते.त्या सर्वाना संस्थेने केलेले कार्य व उद्देशाची पुस्तिका भेट व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेने गेल्या ७ महिन्यात विविध उपक्रम राबविलेत त्यात गावातील मरणकार्यासाठी विनामूल्य मंडप सेवा व खुर्च्या,गरजू रुग्णांना बेड व वाकर सुविधा, वृद्धाश्रम - अनाथाश्रम - मनोरुग्ण केंद्रातील असंख्य लोकांना अन्नदान, दुर्गम भागातील आदिवासी पाड्यावर अन्नदान, स्वच्छ गाव- सुंदर गाव योजना, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, गरजु विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप,महीला व मुलींसाठी रांगोळी स्पर्धा - चित्रकला स्पर्धा हे कार्यक्रम घेतले आहे.

संस्थचे कार्य बघता कै. लक्ष्मण जगू पाटील यांच्या स्मरणार्थ मनोहर लक्ष्मण पाटील(निंबोल) व परिवाराने १७५५ स्के. फुट जागा संस्थेस भेट दिली आहे.तसेच कै.विश्वनाथ भगवान पाटील यांच्या स्मरणार्थ भागवत विश्वनाथ पाटील (निंबोल) व परिवाराने एक खोलीचे बांधकाम करुन देण्याचे जाहीर केले आहे.त्याबद्दल त्यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मुख्याध्यापक एन.व्ही.पाटील यांनी संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत विविध योजना व संस्थेचे उद्देश सांगत  पुढील काळात संस्थेमार्फत शैक्षणिक, सांस्कृतिक व आरोग्य विषयक विविध उपक्रम कसे राबवता येतील याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.तसेच भूमिपुत्रांमधून प्रा.डॉ सुरेश तायडे (से.नि.उपप्राचार्य) व वि.वा. पाटील (गुरुजी ) यांनी समाजाचेही आपण देणे लागतो सांगत जन्मभूमीत आपल्या वाटचालीबद्दल विचार व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी संस्थेचे जितेंद्र पाटील, विजय महाजन, सचिन पाटील, सदाशिव सोनवणे , राहुल गुरुजी, विजय पाटील ,डॉ. पंकज पाटील, योगेश पाटील(पो.पाटिल) ,डॉ. संदीप पाटील रुपेश पाटील, योगेश पाटील ,निलेश पाटील ,अतुल पाटील, शे.कबिर शे. कदिर, निखिल पाटील यांनी परिश्रम घेतले.आभार राहुल पाटील (गुरुजी) यांनी तर संचलन रुपेश पाटील यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com