चोपड्यातील ऑनर किलिंग प्रकरण : अखेर मास्टर माईंड वकीलावर गुन्हा दाखल

संशयित आरोपींची संख्या पोहचली १३ वर ; ११ संशयितांना २३ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी
चोपड्यातील ऑनर किलिंग प्रकरण : अखेर मास्टर माईंड वकीलावर गुन्हा दाखल

चोपडा Chopda ( प्रतिनिधी )
शहरातील प्रेमीयुगलाची ऑनर किलिंग (Honor killing of lovers) पद्धतीने हत्त्या (killing)करण्यात आल्याच्या घटनेनंतर अखेर संशयित मास्टर माईंड वकील (Suspected mastermind lawyer) व मध्यप्रदेशातील गावठी कट्टा (Village katta sellers) विकणाऱ्या इसमावर गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे आरोपींची संख्या १३ वर पोहचली आहे.त्यापैकी ११ संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून,सर्वांना दि.२३ ऑगस्ट पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.तर संशयित मास्टरमाईंड वकील अड.नितीन पाटील व मध्यप्रदेशातील गावठी कट्टा विकणारा शेखर शिकलकर असे दोन्ही संशयित आरोपी फरार आहेत.

मास्टर माईंड वकिलाने अटकपूर्व जामिनासाठी अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.प्रेमीयुगलाच्या हत्त्या प्रकरणात अखेर मास्टर माईंड वकिलाचा संशयित आरोपी म्हणून समावेश झाल्याने चोपड्यात प्रचंड खडबळ उडाली आहे.

प्रेमप्रकरणात भावाने बहिणीचा गळा आवळून तर प्रियकरावर गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून दोघांची हत्या केल्याची घटना शहरातून जाणाऱ्या जुना वराड रस्त्यावरील नाल्यात दि.१२ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घटना घडली होती. घटनेनंतर रात्रीच उशिरा संशयित आरोपी करण ऊर्फ कुणाल कोळी हा गावठी कट्टा घेऊन स्वतः शहर पोलीस स्टेशनला हजर होऊन दोघांना मारून आल्याचे सांगून गुन्हा कबूल केला होता.

प्रेमीयुगलाच्या हत्याकांडात पहिल्याच दिवशी पाच संशयितांना बारा तासाच्या आत पोलिसांनी अटक केली होती.त्यानंतर पोलीस तपासात धक्कादायक माहिती मिळाल्याने हत्त्याकांडाच्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून आरोपींच्या संख्येत वाढ होऊन संशयितांची संख्या १३ वर पोहचली आहे.त्यात संशयित म्हणून मास्टर माईंड वकील अड.नितीन पाटील (गरताड ता.चोपडा) व मध्यप्रदेशातील गावठी कट्टा विकणारा शेखर शिकलकर यांचा समावेश आहे.

एकूण १३ आरोपीं पैकी दोन संशयित आरोपी अल्पवयीन असल्याने बाल न्यायालयाच्या आदेशाने त्यांची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे.तर ११ संशयित आरोपी दि.२३ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत असून,संशयित मास्टर माईंड वकील अड.नितीन पाटील व मध्यप्रदेशातील पार उमर्टी येथील गावठी कट्टा विकणारा शेखर शिकलकर हे दोन्ही फरार आहेत.पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com