धक्कादायक : डॉक्टरविरुध्द हनी ट्रॅप : सात लाखांच्या खंडणीची मागणी

चार महिलांसह आठ जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा
धक्कादायक  : डॉक्टरविरुध्द हनी ट्रॅप  : सात लाखांच्या खंडणीची मागणी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील एका 40 वर्षीय डॉक्टरला (doctor) हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकवून त्याच्याकडे 7 लाखांची खंडणीची (Demand for ransom) मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत डॉक्टरने दिलेल्या फिर्यादिनुसार चार महिलांसह 8 जणांविरुद्ध (Against 8 including four women) जळगाव शहर पोलिसात (Jalgaon City Police) गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपींनी संगनमत करुन कट रचून डॉक्टरला शरीरसुखाची ऑफर देत दोघा महिलांच्या साथीदारांनी व्हिडीओ चित्रीकरण केले. यापैकी एक महिला जळगाव शहरातील व दुसरी यावल तालुक्यातील आहे. या व्हिडीओ चित्रीकरणाच्या बळावर चेतन व हिरामण नावाच्या दोघांनी डॉक्टरला चापटाबुक्क्यांनी मारहाण करत व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

दुसरे साथीदार प्रदिप व संदीप या दोघांच्या मदतीने सात लाख खंडणीची मागणी करण्यात आली. सात लाख रुपये दिले तरच तुमचे मॅटर संपेल नाहीतर हे व्हिडीओ व्हायरल केले जाईल व तुमची समाजात बदनामी होईल, जीवनातून उठवून टाकण्याची धमकी देण्यात आली असे डॉक्टरने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

या त्रासाला कंटाळून डॉक्टरने शहर पोलीस ठाण्यात येवून तक्रार दिली आहे.

याप्रकरणी चार महिलांसह चेतन राजेंद्र कासार, हिरामण एकनाथ जोशी, प्रदीप सुरेश कोळी, (सैदाणे), संदीप बबन लोंढे (सर्व रा. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात चार महिला व चार पुरुष अशा एकुण आठ जणांचा समावेश आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com