गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आज जिल्हा दौर्‍यावर

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा घेणार आढावा
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आज जिल्हा दौर्‍यावर

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील Home Minister Dilip Walse-Patil हे उद्या दि. 20 रोजी जिल्ह्यातील विविध विकासकामांचे (development works) उद्घाटन (Inauguration) करण्यासाठी जिल्हा दौर्‍यावर (district tour) येत आहे. यावेळी ते कायदा व सुव्यवस्थेविषयी आढावा बैठक देखील घेणार आहेत.

जिल्ह्यातील विकासकामांचा शुभारंभ करण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील जिल्हा दौर्‍यावर येत आहे. यावेळी सकाळी 7 वाजता ते मुंबई येथून विमानाने जळगावकडे प्रयान करणार असून सकाळी 8.50 मिनीटांनी त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते मोटारीने चोपड्याला जाणार आहेत. त्यानंतर सकाळी 10 वाजता चोपडा नगरपरिषदेच्या महाराष्ट सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान अंतर्गत चोपडा शहरातील नवीन पाणीपुरवठायोजनेचा शुभारंभ करणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता चोपडा येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्याला उपस्थिती देणार आहे. 1 वाजता माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या घरी सदिच्छा भेट देणार असून त्यानंतर धरणगावरोडवरील सहकारी सुतगिरणीचे जिनींग व प्रोसिंग प्रकल्पाचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर जळगाकडे येणार आहेत. दुपारी 3.15 वाजता पोलीस मुख्यालय परिसरातील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या शासकीय निवासस्थानांच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे.

कायदा सुव्यवस्थेचा घेणार आढावा

पोलीस मुख्यालयाच्या आवारातील पोलिसांच्या इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर दुपारी 4 वाजता नाशिक परिक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्था व इतर विषयांच्या अनुषंगाने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालयात आढावा बैठक घेणार आहे. त्यानंतर 5.30 ते 6.30 वाजेपर्यंत अजिंठा विश्रामगृहात वेळ राखीव राहणार आहे. त्यानंतर 7 वाजता खासगी विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहे.

Related Stories

No stories found.