बांधकाम साहित्य लांबविण्यासह घरफोडी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

जळगाव शहर पोलिसांकडून दोन गुन्हे उघड ः सहा संशयितांना अटक
बांधकाम साहित्य लांबविण्यासह घरफोडी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

जळगाव- jalgaon

शहरात बांधकाम साहित्यासह घरफोड्या करणार्‍या टोळीचा जळगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सहा संशयितांच्या (police) पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. अटकेतील संशयितांकडून राधाकृष्ण नगरातून लांबविलेले ५३ हजारांचे बांधकाम साहित्य व गेंदालाल मिलमधील एका घरातून लांबविलेले पाच हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राधाकृष्ण नगरात असलेल्या एस.के.ऑइल मीलच्या मागील बाजूला एक बांधकाम साईटवरुन मुद्देमाल लांबविल्याप्रकरणी गुन्ह्यात शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर ठाकरे, प्रणेश ठाकूर, विजय निकुंभ, उमेश भांडारकर, संतोष खवले, गणेश पाटील, योगेश बोरसे, तेजस मराठे, रतन गिते, योगेश इंधाटे यांनी संशयित रईस समशेर पठाण वय २४, किरण अनिल बाविस्कर वय २४ गौरव जगन साळुंके वय २० , विशाल वाल्मिक जाधव वय २३ आकाश सुरेश बर्वे वय २३ सर्व रा. गेंदालाल मिल व संदीप भास्कर ठोके वय २४ रा. रा. लक्ष्मीनगर या सहा संशयितांना शुक्रवारी अटक केली होती.

त्यांच्याकडून बांधकाम साईटवरून चोरलेल्या मालापैकी ५३ हजारांचा मुद्देमाल कजप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या संशयितांपैकी रईस समशेर पठाण याने आणखी इतर दोघांसह गेंदालाल मील परिसरातील शेख रफिक रशीद यांच्या घरातून दि. ६ ऑक्टोबर रोजी ५ हजार रोख चोरल्याची कबुली दिली असून ते पाच हजार रुपयेही त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहे. दरम्यान संशयितांकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस निरिक्षक विजय ठाकूरवाड यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.