विद्यापीठ सुधारणा विधेयकाची होळी

अभाविपतर्फे विद्यापीठात आक्रोश मोर्चा; विधेयक रद्दची मागणी
विद्यापीठ सुधारणा विधेयकाची होळी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्य सरकारने (State Government) विद्यापीठ अधिनियम (University Act) 2016 सुधारणा विधेयक (Amendment Bill) पारित केले. विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे राजकीयकरण या निर्णयामुळे होईल. या सर्व विषयांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) गुरुवारी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये (Poet Bahinabai Chaudhary at North Maharashtra University) विद्यार्थी आक्रोश मोर्चा (Student Outrage Front) काढून प्रतीकात्मक सुधारणा विधेयक पुतळ्याची होळी (Holi of the Bill Statue) करण्यात आली. यावेळी कुलसचिवांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

राज्य शासन पूर्णपणे कुलपती अधिकारात हस्तक्षेप करीत आहे. विद्यापीठामध्ये कुलपती पदावर प्र. कुलपती म्हणून एक नवीन पद निर्माण करण्यात आले असून त्या पदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यावरून विद्यापीठांच्या स्वायतत्तेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्यशासन करीत आहे. यावरून स्पष्टपणे राजकीय पक्ष , नेते यांचा अवाजवी हस्तक्षेप निर्णय प्रक्रियेत वाढेल. कुलपती हे सर्व विद्यापीठांचे प्रमुख आहेत , त्यांच्या अधिकारांवर हे सर्वार्थाने आक्रमण आहे. या निर्णयाने सर्व गुणवत्ताधारक प्राध्यापक, विद्यार्थी यांच्यावर विपरीत परिणाम राजकीय दबावाने होऊ शकतो. विद्यार्थ्यांना प्रत्येक निर्णयामध्ये राज्य शासनाकडे बघावे लागेल. विद्यापीठांची गुणवत्ता पूर्णपणे ढासळण्याची शक्यता या निर्णयाने निर्माण होत आहे. विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे राजकीयकरण या निर्णयामुळे होईल.

अन्यथा राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन

यासर्व विषयांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगावतर्फे कुलसचिवांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढून प्रतीकात्मक सुधारणा विधेयक पुतळ्याची होळी करण्यात आली. राष्ट्रीय शिक्षा नीतीला प्रतिकूल असलेला हा कायदा विद्यार्थी हिताचा विचार करून तात्काळ रद्द करावा व विद्यापीठाची स्वायत्तता अबाधित राखावी अन्यथा विद्यार्थी परिषद राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा अभाविप जळगाव महानगर मंत्री रितेश महाजन यांनी राज्य शासनाला दिला. या विद्यार्थी आक्रोश मोर्चामध्ये विविध महाविद्यालयाचे 100 पेक्षा अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. या विद्यार्थी आक्रोश मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य रितेश महाजन यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com