मेंदूत द्वेष भरलेला इतिहास कधीच सत्य नसतो!

मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन
मेंदूत द्वेष भरलेला इतिहास कधीच सत्य नसतो!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जे घडले नाही, ते इतिहासाच्या (history) नावाने खपवीत असाल, तर ते योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) स्वराज धर्मनिरपेक्ष आणि माणसाला कवटाळणारे,माणसाला त्याच्या मनाला जोडणारे होत. मेंदूत द्वेष (Brain hate) भरलेला इतिहास सत्य नसतो. दोन्हीकडे विकृती आहे. या विकृतीतून (distortion) समाजाची सुटका (Liberation of society) करावयाची आहे. सत्याची निष्ठा जपावी लागेल, असे परखड मत पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष (Former President of Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस (Prof.Dr. Shripal Sabnis) यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र जनक्रांती मोर्चातर्फे (Maharashtra Jankranti Morcha) रविवारी अस्मितादर्शकार पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे (Padma Shri Dr. Gangadhar Pantawane) यांच्या स्मृती अभिवादनानिमित्त शहरातील कला, वाणिज्य आणि गृहविज्ञान महाविद्यालयात (एसएनडीटी) प्रा.डॉ. सबनीस यांचे व्याख्यान (Lecture) झाले.

महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे हे अध्यक्षस्थानी होते. विचारमंचावर प्रमुख अतिथी महापालिकेच्या प्रभाग समितीचे सभापती प्रा.डॉ.सचिन पाटील, सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागूल, सामाजिक कार्यकर्ते फईम पटेल, एरंडोल येथील अ‍ॅड. मोहन शुक्ला उपस्थित होते. सुरुवातीला अस्मितादर्शकार डॉ. गंगाधर पानतावणे यांना अभिवादन करण्यात आले.

प्रास्ताविक डॉ. मिलिंद बागूल यांनी केले. सूत्रसंचालन बापू पानपाटील यांनी केले. एन.डी.सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्रा.डॉ.सतीश जाधव, चारुदत्त गोखले, प्रा.डॉ.प्र.ज.जोशी, अमोल कोल्हे, दिलीप सपकाळे, दिलीप सपकाळे, ज्येष्ठ पत्रकार दीपक महाले, उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे,मिलिंद केदार, इंदिरा जाधव, प्रा. डॉ. लभाणे, महेंद्र पाटील, प्रा. डॉ. वळवी, संजय ठाकूर, महेंद्र केदार, निलूबाई इंगळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी अमळनेर येथील प्रा.डॉ.प्र.ज.जोशी लिखित मराठीचा भाषिक अभ्यास या पुस्तकाचे प्रकाशन प्रा.डॉ. सबनीस, डॉ. बागूल, अ‍ॅड. शुक्ला, प्राचार्य सचिन पाटील, फहिम पटेल यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाला शहरासह जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर इतिहासातील जातीची भांडणे थांबण्याची गरज

शिवरायांच्या स्वराज्याला (Swarajya) जात-धर्म नाही. प्रत्येक इस्लामचा माणूस शिवाजी महाराजांच्या विरोधात नव्हता. अनेक जातींची गुणवान माणसे स्वराज्यात होती. महाराष्ट्र शांत करायचा असेल तर इतिहासातील जातीची भांडणे (Caste quarrel) थांबविली पाहिजेत. शिवाजी महाराजांचे विचार जातीयवादांना कलम करणारा आहे. आता विवेकवादाची भूमिका घेणार्‍यांंची बेरीज मला करावयाची आहे. महाराष्ट्राचे भवितव्य भेसूर आहे. गळ्यात गळा घाला. माणसाचे हित आता जोपासावे, असेही प्रा.डॉ. सबनीस यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com