केळी पट्यात केळीला ऐतिहासिक भाव : यंदाच्या भावाने सर्व विक्रम मोडले

केळी पट्यात केळीला ऐतिहासिक भाव : यंदाच्या भावाने सर्व विक्रम मोडले

रावेर Raver|प्रतिनिधी-

सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्रावर केळी (banana) लागवड करणाऱ्या रावेर तालुक्यात केळीला चांगले दिवस पाहायला मिळत आहे. वादळाचा तडाखा,सीएमव्ही व्हायरस व करपा या रोगांमुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडलेल्या (Found in financial crisis) शेतकऱ्यांना (farmers) हि सुसंधी अनुभवता येत आहे. यंदा बाजारात फळाची आवक कमीच आहे. आंबा व इतर फळे देखील बाजारातील कब्जा करू शकले नाही.त्यामुळे तालुक्यातील केळीसाठी परराज्यातून (foreign countries) मोठी मागणी (Great demand) होत असल्याने, अपेक्षित पुरवठा होवू शकत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे केळीला (Prices of bananas) अडीच हजारांपर्यंत भाव (two and a half thousand) मिळत आहे.हा आज पर्यंतचा सर्वोत्तम भाव असून,यापूर्वी केळी भावाचे विक्रम मोडून काढणारा आहे.

सोमवारी तांदलवाडी येथील शेतकऱ्यांच्या केळीला अडीच हजार रुपये प्रती किं.भाव मिळाला आहे.त्यामुळे रावेर तालुक्यातील केळी बागांच्या गुणवत्तेबाबत अधिक विश्वासार्हता निर्माण झाली आहे. खान्देशी केळीचा दर्जा व गुणवत्ता तसेच नैसर्गिक चवदारपणा,रंग हे गुण टिकून आहे.इतर ठिकाणी उत्पादित होणाऱ्या केळीपेक्षा अधिक अन्नघटक व रुचकर केळी म्हणून असलेला नावलौकिक तसाच आहे.

याशिवाय आता केळी उत्पादक शेतकरी चांगल्या केळी बागा व्हाव्यात यासाठी विविध उपाय योजना करतात.त्या केळीला तजलेदारपणा याव्या अशी काळजी घेत असल्याने,भावाची पातळी बोर्ड भावापेक्षा अधिक आहे.रावेर बाजार समितीत सध्या नवती व कांदेबागासाठी २११०,पिलबाग २०१० हे भाव आहेत.

मात्र जून-जुलै मध्ये अशी उलट परिस्थिती झाली आहे कि,बोर्ड भावापेक्षा तब्बल ४०० रुपये ऑन देवून व्यापारी कापणी करत आहे.तांदलवाडी (ता.रावेर) येथील शेखर चौधरी यांच्या बागेतील केळीला २५०१ रुपये भाव देण्यात आला आहे.त्यांची कापणी दि.११ रोजी सोमवारी सावदा येथील व्यापारी महेश यांनी केली आहे.

सध्या दिल्ली,हरियाणा,पंजाब,जम्मू,काश्मीर,श्रीनगर या भागात केळी निर्यात आहे.मात्र मागणी अधिक असून त्या प्रमाणात पुरवठा कमी आहे.पुढील महिन्यात असंख्य केळी बागा तयार होत असल्याने,भाव टिकून राहावे अशी अपेक्षा उत्पादक करत आहे.या पूर्वी धुरखेडा भागातील शेतकरी विपिन पाटील यांनी देखील विक्रमी भाव घेतले आहे.

गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात केळी बागांवर सिएमव्हीचा प्रादुर्भाव झाल्याने,लागवडी कमी झाल्या होत्या.आम्ही लागवड करतांना अनेक टप्पे करून बागा उभ्या केल्या असल्याने या महिन्यात कापणी लायक असलेल्या बागांना चांगले भाव मिळत आहे.यासाठी संपूर्ण फ्रुटकेअर केली होती.बागांची निगा राखल्याने,अडीच हजार रुपये भाव मिळाले आहे.

शेखर चौधरी,केळी उत्पादक शेतकरी,तांदलवाडी

यंदा बाजारात केळीला मोठी मागणी होत आहे.गेल्या वर्षी सीएमव्हीमुळे नुकसान झाले होते.वादळाने देखील अनेक बागा भुईसपाट झाल्या,त्यामुळे देखील मोठी तुट पडली आहे.शिवाय इतर फळे बाजारात मुबलक दाखल झाले नाहीत,आंब्याचे भाव १०० रुपयापर्यंत टिकून असल्याने याचा बेनिफिट म्हणून केळीची मोठी मागणी झाली,केळी मालाचा शोर्टेज असल्याने भाव गेल्या महिन्यापासून टिकून आहे.हे सर्वोत्तम भाव आहे.आता पर्यंत विक्रमी भाव कधी महिनाभर राहिले नाहीत,ते यंदा उत्पादकांच्या वाट्याला आले आहे.

विशाल अग्रवाल,रुची बनाना एक्स्पोर्ट,रावेर.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com