
रावेर|प्रतिनिधी raver
जिल्हा बँकेच्या (District Bank) संचालिका जनाबाई महाजन यांनी निवडणूक (Election) खर्च सादर न केल्या प्रकरणी सहकार आयुक्त यांनी केलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरुद्ध उच्च न्यायालयात (High Court) जनाबाई यांनी धाव घेतली होती.त्यात त्यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जनाबाई महाजन यांनी माजी आमदार अरुण पाटील यांचा पराभव केला होता.या नंतर माजी आमदार अरुण पाटील यांचे पुतणे मंदार पाटील यांनी तीन अपत्य आणि निवडणूक खर्च सादर न केल्याने सहकार आयुक्त व न्यायालयात दाद मागितली होती.त्यातील निवडणूक खर्चाच्या तक्रारीवरून सहकार आयुक्त यांनी जनाबाई महाजन यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली होती.
या कारवाई विरुद्ध जनाबाई महाजन यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती मिळण्यासाठी धाव घेतली होती.त्यावर मंदार पाटील यांनी देखील आयुक्त यांच्या निर्णयाला स्थगिती देवू नये अशी मागणी उच्च न्यायालयात केली होती.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून उच्च न्यायालयाने जनाबाई महाजन यांना दिलासा दिला आहे.या निर्णयाचे जनाबाई महाजन यांच्या समर्थकांनी फटाके फोडून स्वागत केले आहे.