जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा, 35 जणांचे पथक नियुक्त

घोडसगाव येथील बांधार्‍यांची भिंत पुराच्या पाण्यात गेली वाहून
जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा, 35 जणांचे पथक नियुक्त

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री (midnight) पासून मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरु आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पाचोरा, भडगासह चाळीसगाव तालुक्यांना पुराचा तडाखा (flood hit) सहन करावा लागत आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्यामुळे धुळे येथील राज्य स्तरीय आपत्ती दलाची (State level disaster relief) 35 जणांची टीम जिल्ह्यात दाखल झाली आहे.

जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांसह धरणे शंभरटक्के भरले असून ते ओसांडून वाहत असल्याने या प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. यातच सोयगाव तालुक्यातील डोंगराळ भागात झालेल्या पावसामुळे बहुळा नदीच्या प्रवाहात वाढ झाली असून घोडसगाव बंधार्‍यात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झाली आहे. त्यामुळे बंधार्‍याची तीन फूट उंचीची भींत वाहून गेली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपळगाव- हरेश्वर, भोजे, चिंचपुरे, वरखेडी भागाला पुराचा वेढा पडला आहे. संबंधित गावांचे तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील यांना आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना दिलेल्या आहेत. पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुराच्या पाण्यामुळे नागरिकांना स्थालांतरण देखील केले जात आहे.

जिल्ह्यातील सर्व प्रकल्प ओव्हर फ्लो

सोमवारी रात्री पासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. बोरी मध्यम प्रकल्पाचे 9 दरवाजे, वाघुर धरणाचे 10 दरवाजे, मोर मध्यम प्रकल्पाचे 2 दरवाजे तर हतनूर धरणाचे सहा दरजवो पुर्णपणे उघण्यात आले असून त्यातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तसेच हिवरा, अग्नावती, मंगरुळ आणि तोंडापूर मध्यम प्रकल्प देखील शंभर टक्के भरले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

प्रशासकीय यंत्रणा सज्ज

चाळीसगाव, पाचोर्‍यासह भडगाव तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने या तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. चाळीसगावमध्ये पुन्हा पुरस्थिती निर्माण झाली असल्याने प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आपत्तीजन्य परिस्थिती नियंत्रणासाठी धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची 35 जणांचे पथक दाखल झाले आहे. त्यापैकी दहा जणांचे पथक बोटीसह पाचोरा तालुक्यात दाखल असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ यांनी दिली आहे.

सतर्क राहण्याचे आवाहन

अतिवृष्टीमुळे झालेल्या पुरस्थिती नियंत्रणात आहे. प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झालेली आहे. त्यांच्या माध्यमातून मदत कार्य सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com