
योगेश पाटील - पारोळा parola
तालुक्यातील करंजी बुद्रुक येथे दि.5 रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अचानक (Heavy rain) मुसळधार पाऊस सुरू झाला त्यानंतर गावातील धोक्याच्या ठिकाणी असलेली घरे खाली करून घरातील कुटूंब बाहेर निघालेत, तर गावातील अनेक घरांमध्ये पाणी घुसले.
तीन ते चार घरं पडून नुकसान झाले आहे वरील भागातील शेवगे प्रगणे भहाळ, हिवरखेडे, मुंदाणे, सोके, मुंदाने प्र उ या भागात ढगफुटी सारखा पाऊस पडल्यामुळे मुंदाने गावाजवळील फरशी पुलावरून पाणी भरून नवनाथ बाबा नाल्याद्वारे सदर पाणी हे करंजी गावात घुसले.
करंजी गावातील बळीराम ताराचंद भील, शरद बंसीलाल भील, नंदु मोहन माळी, प्रकाश मोहन माळी ,दिलीप भील, रमेश बंसीलाल भील, दत्तु महादु माळी, संजय हिम्मतराव पाटील, साहेबराव महादु पाटील यांच्यासह बऱ्याच जणांच्या घरात व शेतांमध्ये पाणी घुसून जबरदस्त नुकसान झालेले आहे. यामध्ये सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झालेली नसून आज दि.5 रोजी सकाळी महसूल विभागाचे अधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केले.
तर पोलिस विभागाचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव यांच्यासह बिट अंमलदार यांनी करंजी गावाला भेट दिली करंजी सह आजूबाजूच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक गावात नुकसान झाले आहे. तेथीलही पंचनामा करण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थ यांनी केली आहे.