भंगार गोडाऊनला भीषण आग

जवळपास दोन लाखांचे साहित्य जळून खाक
भंगार गोडाऊनला भीषण आग

भुसावळ । Bhusawa l प्रतिनिधी

शहरातील शिरपूर कान्हाळा रोडवर असलेल्या घोडे पीर बाबाच्या दर्ग्याजवळील भंगार गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली यात लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील घोडेपीरबाबा परिसरात अब्दुल अजीज यांचे भंगारचे गोडाऊन असून विजेच्या खांबावरील तार प्लास्टिक भंगार व कोरड्या गवतावर पडल्याने ही आग लगल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे. दि.22 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास अब्दुल अजीज यांच्या अक्रम स्टीलच्या स्क्रॅपवर इलेक्ट्रिक खांबावरील वायर तुटून शॉर्टसर्किट होऊन गोडाऊनमधील भंगार साहित्य जळून खाक झाले. आग इतकी भीषण होती की, गोदामात ठेवलेले प्लास्टिक, कचरा, पाईपच्या नळ्या व इतर साहित्य जळून खाक झाले असून, यात सुमारे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाल्याचे अब्दुल अजीज यांनी सांगितले.

आग लागल्याची घटना परिसरात कळताच घटनास्थळी नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग भीषण असल्याने अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले, परंतु अग्निशामक दल घटनास्थळी उशीरा आल्यामुळे आगीने भिषणरुप घेतले होते. प्रसंगी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या आणि पालिकेच्या 3 टँकरने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com