व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवले हार्टफुलनेस मेडीटेशन

व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवले हार्टफुलनेस मेडीटेशन

जळगाव jalgaon प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) आणि हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्ट (Heartfulness Education Tru st) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ ते १६ सप्टेंबर या कालावधीत व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेतील (Faculty of Management) विद्यार्थ्यांसाठी (students) हार्टफुलनेस मेडीटेशन (Heartfulness Meditation) शिबीर (Camp) घेण्यात आले.  

विद्यापीठ आणि हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्ट यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार  विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थकरिता हार्टफुलनेस ध्यान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.  विद्यापीठात शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सेमिस्टरनुसार १ सप्टेंबर २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत विद्यापीठातील सर्व प्रशाळांमध्ये योग शिबीर आणि ध्यान शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे.

 या अंतर्गत हे शिबीर आयोजित करण्यात आले या शिबीरात ८३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सदर विद्यार्थ्यांना हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्टच्या डॉ.नीलम अग्रवाल आणि प्रा.प्रभावती महाजन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी योग मार्गदर्शन केंद्राच्या डॉ.लीना चौधरी आणि योगशिक्षक कृणाल महाजन यांनी शिबिराचे नियोजन केले. तसेच प्रशाळेचे संचालक प्रा.अनिल डोंगरे, प्रा.समीर नारखेडे, डॉ.मधुलिका सोनवणे, डॉ.पवित्रा पाटील, डॉ.राम चव्हाण, डॉ.अतुल बोरकर, डॉ.मिलिंद धनराज, डॉ.यशोदीप पाटील, हर्षल नेरकर आणि सागर वखारे यांचे सहकार्य लाभले आहे.  

यानंतर टप्प्या टप्प्याने फेब्रुवारी २०२३ अखेरपर्यंत योग ध्यान शिबीर आणि हार्टफुलनेस मेडिटेशन शिबीर विद्यापीठाच्या सर्व प्रशाळांमध्ये राबविण्यात येत आहे. सर्व प्रशाळांमधील विद्यार्थ्यांनी योग ध्यान शिबीर आणि  हार्टफुलनेस मेडिटेशन शिबीराचा जास्तीजास्त लाभ घ्यावा असे आवाहन योग मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख इंजि. राजेश पाटील यांनी केले आहे.    

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com