आरोग्य सहाय्यीका आशा गजरे यांच्या कार्याची पंतप्रधानांकडून दखल

आरोग्य सहाय्यीका आशा गजरे यांच्या कार्याची पंतप्रधानांकडून दखल

लासुर (Lasur) ता.चोपडा (वार्ताहर)

येथील सेवानिवृत्त आरोग्य सहायिका (Retired Health Assistant) श्रीमती आशा पंडीत गजरे (Mrs. Asha Pandit Gajre) यांनी कोरोना प्रादूर्भावात (Corona epidemic) नागरिकांची घरोघरी जात आरोग्य सुविधा (Health facilities) पुरविल्या याचीच दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी त्यांच्या कार्याचे मेलद्वारे कौतुक (appreciation) केले आहे.

श्रीमती.आशा पंडित गजरे यांनी कोरोना काळात कोरोना लसीकरण व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करून कोरोना पासून संरक्षण मिळावे म्हणून खूप प्रयत्न केले स्वतः घरोघरी जाऊन प्रवृत्त केले व लसीकरण साठी मार्गदर्शन करून चांगल्या प्रकारे लसीकरण मोहीम हर घर दस्तक घरोघरी जाऊन लसीकरण केले लासुर प्राथमिक आरोग्य केंद्र या कार्यक्षेत्रात आदिवासी वस्ती आहेत तेथील लोकांना प्रसिद्धी माध्यमांच्या द्वारे जनजागृती करून लसीकरण मोहीम राबविली कोरोना काळात स्वतः कोरोना संसर्ग झाल्याने खूपच तब्येत बिघडली तरीसुद्धा लोकांच्या मनातील भीती दूर करून त्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचे व्यवस्थापन केले

या काळात स्वतःची आई वारली तरीसुद्धा अंत्यसंस्कार साठी जाऊ शकले नाही व न डगमगता त्यांनी पुढे चालण्याचा मार्ग शोधत त्यांच्या सेवेचा लोकांना जास्तीत जास्त लाभ मिळवून दिला आणि त्यामुळेच त्यांनी आतापर्यंत अतिदुर्गम भागात सेवा देऊन लोकांना आरोग्य विषयक माहिती आदिवासी लोकांपर्यंत त्यांची त्यांची सेवा पोचली आणि त्यांच्या कामाची दखल घेत माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दखल घेत त्यांची प्रशंशा केली.

या त्यांच्या अविरत सेवेबद्दल या अगोदर त्यांना संस्थांनी व शासकीय संस्था अनेक पुरस्कारांनी गौरवले त्यामध्ये दामिनी पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार आयडॉल्स महाराष्ट्र राजीव गांधी आदर्श कर्मचारी पुरस्कार बेटी बचाव बेटी पढाव व केंद्र शासनाने सुद्धा त्यांच्या या अगोदरच्या अति उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती महामहीम रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पाच डिसेंबर 2019 या दिवशी नॅशनल लॉरेन्स नाइटिंगेल अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com