ओमायक्रोन व्हेरीएनटच्या पार्श्वभूमीवर सोयगावला आरोग्य आणि महसूल विभाग सतर्क

तीन जानेवारीपासून विद्यार्थ्यांचे लसीकरण
ओमायक्रोन व्हेरीएनटच्या पार्श्वभूमीवर सोयगावला आरोग्य आणि महसूल विभाग सतर्क

सोयगाव,Soygaon

मुंबईसह जिल्ह्यात ओमायक्रोनच्या (Omycron) विषाणू धडकला असल्याने सोयगावला आरोग्य आणि महसूल विभाग (Health and Revenue Department) सतर्क (alerted) झालेला आहे.त्यासाठी तीन जानेवारीपासून सोयगाव तालुक्यात शाळांमधील (Schools) आठ हजार ७७ विद्यार्थ्यांचे लसीकरण (Vaccination of students) करण्याचा सूक्ष्म नियोजन कार्नुयात आलेले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे (Taluka Health Officer Dr. Srinivas Sonawane) यांनी दिली आहे.

सोयगाव तालुक्यात या विषाणूला रोखण्यासाठी तत्परतेने पावले उचलण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान महसूल विभागानेही यासाठी उपाय योजना हाती घेतल्या आहे गुरुवारपासून तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच चाचणी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आलेला असल्याचे तहसीलदार रमेश जसवंत यांनी सांगितले त्यामुळे आरोग्य आणि महसूल विभाग कामाला लागला आहे.

ओमायक्रोन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य विभागाकडून तीन जानेवारी पासून तालुक्यातील २९ माध्यमिक शाळांमध्ये सन २००७ व त्यापूर्वी जन्मलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण हाती घेण्यात येणार आहे त्यासाठी पहिल्या टप्प्यात आठ केंद्रावर एक हजार पाचशे डोस जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिले आहे.१५ ते १८ वय असलेल्या लाभार्थ्यांच या डोस साठी पात्र ठरविण्यात येणार आहे.

त्यासाठी आरोग्य विभागाकडून २००७ व त्यापूर्वी जन्म असलेल्या लाभार्थ्यांच्या याद्यांचे संकलन हाती घेण्यात आले असून दहा जानेवारीपासून शासकीय कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांना दुसरा डोस घेवून ३९ आठवडे पूर्ण झालेले असल्यास या लाभार्थ्यांना प्रीकोशन डोस देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

दरम्यान जिल्ह्यात आलेल्या या विषाणूचा अटकाव करण्यासाठी सोयगाव तालुक्यात आरोग्य आणि महसूल विभागाने कंबर कसली असून त्यासाठी खासगी वैद्यकीय सुविधा पुरविणाऱ्या सर्वच खासगी डॉक्टरांना महसूल विभागाने जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्या आदेशावरून खासगी रुग्णालयात येणाऱ्या आय.एल.आय,सारी,कोणत्याही प्रकारची शस्रक्रिया आणि प्रसूती साठी आलेल्या मातांना मोफत कोविड चाचणी करण्याबाबतचे पत्र तहसीलदार रमेश जसवंत यांनी आरोग्य विभागाला दिले असून यामुळे कोरोना संसर्गाची तिसरी लाट आणि ओमायक्रोन विषाणूला प्रभावीपणे आळा घालण्यात यश येईल असे या आदेशात म्हटले आहे.

सोयगाव तालुक्यात ओमायक्रोन विषाणू आणि संभाव्य तिसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी चाचण्या वाढविण्यात आलेल्या असून संशय वाटल्यास कोरोना चाचणी केलेल्या रुग्णाच्या जीनोम सिक्वेन्सिंग अहवाल मागविण्यात येत आहे.त्यामुळे सोयगावला ओमायक्रोनचा धोका टाळण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहे.

डॉ.श्रीनिवास सोनवणे

तालुका आरोग्य अधिकारी सोयगाव

ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर सोयगाव तालुक्यात योग्य त्या खबरदारी घेतल्या जात असून नियमांची पायमल्ली करणाऱ्याना तातडीने दंड आकारण्यात येईल तसेच आरोग्य विभागाला लेखी सूचना देवून चाचण्या वाढविण्याबाबत पत्र देण्यात आले आहे.सोयगाव तहसील कार्यालयासह सर्वच शासकीय कार्यालयात चाचण्या करण्यासाठी केंद्र वाढविण्यात येईल...

रमेश जसवंत

तहसीलदार सोयगाव...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com