मोटारसायकलींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, चार जखमी

मोटारसायकलींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, चार जखमी
Accident

पारोळा । parola

तालुक्यातील भोकरबारी (Bhokarbari) धरणाजवळ दोन मोटारसायकलींचा समोरासमोर अपघात होऊन त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले असल्याची घटना दिनांक 27 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.

आज दिनांक 27 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास विजय बापूराव शेंडे व विजय शालीक वानखेडे राहणार रत्नापिंप्री (Ratnapimpri) ता पारोळा हे दोघे आपल्या मोटारसायकल ने पारोळा येथून आपले मेडिकल दुकान बंद करून घरी रत्नापिंप्री येथे जात असताना त्याचवेळी लखन वाघा वसावे, प्रविण गर्दे, सुकलाल गर्दे असे तीन जण सर्व राहणार पांनसमेर मध्यप्रदेश हे आपल्या मोटारसायकलीने मध्यप्रदेश येथून कामाच्या शोधात पारोळाकडे येत असताना भोकरबारी धरणाच्या परिसरात दोन्ही मोटरसायकलीमध्ये समोरासमोर जबर अपघात झाल्याने त्यात सुकलाल गर्दे याचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर चार जण जखमी झाले आहे. सर्व जखमींना लगेच पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्यावर डॉ चेतन नाईक, डॉ धंनजय पाटील, डॉ प्रविण ठाकरे,ब्रदर पंकज पाटील यांनी प्रथम उपचार करून धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे अपघात होताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू जाधव,ईश्वर ठाकूर, यश ठाकूर, आशुतोष शेलार,मंगला त्रिवेणी, आदीनी मदत केली.

Related Stories

No stories found.