जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी मुखमंत्र्यांची भेट घेणार

माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांची माहिती
जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी मुखमंत्र्यांची भेट घेणार

जळगाव Jalgaon

जिल्ह्यातील धरणांमध्ये In dams एक ते दोन टक्केही पाणी नाही, पावसाळा सुरु होवून दोन महिने उलटले मात्र पुरेसा पाऊस नाही, अशी परिस्थिती जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच उद्भवली असून त्यासाठी जिल्ह्यात कृत्रिम पाऊस Artificial rain पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी Demand to the Chief Minister करणार असल्याची माहिती, आमदार गिरिश महाजन MLA Girish Mahajan यांनी जळगावात भाजपच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलतांना दिली.

राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी दृष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ही भयावह परिस्थिती कोणीही बघायला तयार नाही. आपल्या भागातील दुष्काळी परिस्थिती सुधारण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून कृत्रिम पावसासाठी मागणी करणार आहे.

मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आधी भेटीचे पत्र द्यावे लागेल, त्यानंतर भेट होईल की नाही, ही शंका आहे. भाजपच्या कार्यकाळात शिष्टमंडळ भेट घ्यायचे. आता मात्र शिष्टमंडळ बंद झाले आहे, असाही उपहासात्मक टोला आ.महाजन यांना लगावला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com