घरातून २० हजारांचा ऐवज लांबविला

विठ्ठल मंदीरवार्डातील घटना : गुन्हा दाखल
घरातून २० हजारांचा ऐवज लांबविला

भुसावळ (Bhusawal) प्रतिनिधी -

शहरातील विठ्ठवल मंदीर वार्डातील बंद घरातून (closed house) अज्ञात चोरट्यांनी (unknown thieves) २० हजार ६०० रुपयांचा ऐवज लांबविल्याची (Loot lengthened) घटना. ७ रोजी उघडकील आली. याबाबत बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरद्ध गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, येथील विठ्ठल मंदीर वार्डातील रहिवासी प्रकाश यादव बर्‍हाटे यांचे घर (closed house) १४ मे ते ७ जून दरम्यान घरी नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून (Breaking the lock of the house) तसेच वरच्या घराच्या सान्यातून सीडीने घरात उतरुन घरातील, ४ हजार रुपयांचा देवघरातील चांदीचा तांब्या, दोन हजारांचे चादीचे फुलपात्र, दोन हजारांची चांदीची प्लेट, १५०० रुपयांचे प्रिंटर, २५०० रुपयांचे प्रिंटर, १५०० रुपयांचे होमथेटर, १५०० दोन सीसी टीव्ही, ६०० रुपयांचे कॉम्प्यूटर की बोर्ड, ५ हजार रुपये रोख असा एकुण २० हजार ६०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविला.

याबाबत बाजारपेठ पोलिसात प्रकाश बर्‍हाटे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्या विरुद्ध गुरनं. ३१६/२०२२, भा.दं.वि. ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि सुदर्शन वाघमारे करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com