साहेबांनी तपासणी करायला लावल्याचे सांगत वृद्धाला लुटले

लोणवाडी शिवारातील घटना; एमआयडीसी पोलिसात गुन्हा
साहेबांनी तपासणी करायला लावल्याचे सांगत वृद्धाला लुटले

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

दुचाकीवरुन जात असलेल्या वृद्धाला (old woman) दोन दुचाकीस्वारांनी (two-wheelers) अडविले. दरम्यान, इकडे दोन दिवसांपुर्वी चाकू दाखवून एकाला लुटल्याचे सांगून तुमच्याकडील सोन्याची चैन व अंगठी रुमालात बांधून डिक्कीत ठेवा असे म्हणत हातचलाखी (Manipulation) करीत वृद्धाला लुटल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास लोणवाडी शिवारात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मोहाडी रोडवरील दौलत नगरातील सेवानिवृत्त कर्मचारी शामराव लोटू तायडे (वय-80) हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांची जळगाव तालुक्यातील लोणवाडी शिवारात गट नं 49/1 येथे शेती असून ते शेताची पाहणी (Field inspection) करतात. दरम्यान, सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास तायडे हे त्यांच्या (एमएच 19 बीएक्स 5635) क्रमांकाची दुचाकीने शेतात जाण्यासाठी निघाले. जळके येथून लोणवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर संदिप पाटील यांच्या शेताजवळ दोन दुचाकीस्वार (two-wheelers) त्यांच्या दुचाकीपुढे आले. त्यांनी बाबा गाडी थांबवा असे म्हणून हाताने इशारा करीत तायडे यांची दुचाकी थांबविली.

त्यानंतर दोघ दुचाकीस्वार त्यांच्याजवळ आले आणि म्हणाले बाबा आम्हाला साहेबांनी इकडे ड्युटी लावली आहे. तुमची दुचाकी चेक करायची असून तुमच्या गाडीत गांजा, दारु आहे काय ते पाहू द्या असे म्हणताच शामराव तायडे यांची गाडीची डिक्की उघडून दाखविली.

चोरी होते असे सांगत काढायला लावली चैन व अंगठी

दोघांपैकी एक दुचाकीस्वार तायडे यांना म्हणाला की, दोन दिवसांपुर्वी एकाला चाकू दाखवून लुटले असू येथे चोरी (Theft) होतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या हातातील अंगठी व चैन काढून ठेवा. यावेळी तायडे यांनी त्यांच्याकडील चैन व अंगठी काढून ठेवली. त्या दुचाकीस्वारांनी त्यांच्याकडील चैन व अंगठी घेवून ती रुमालात गुंडाळली आणि आम्ही डिक्कीत ठेवतो असे सांगितले.

बोलण्यात गुंतवून केली हातचालाखी

दुचाकीवर आलेल्यांपैकी एक जण तायडे यांच्यासोबत बोलत राहिला तर दुसर्‍याने त्यांच्याकडील अंगठी व चैन रुमालात गुंडाळून ते त्यांच्या गाडीच्या डिक्कीत ठेवल्याचा बहाणा केला. त्यानंतर ते दोघे दुचाकीने जळकेकडे निघून गेले. दरम्यान, ते दोघे गेल्यानंतर तायडे यांनी डिक्कीत बघितले असता, त्यांना रुमालात अंगठी व चैन आढळून आली नाही.

सव्वा लाखांचा ऐवज लांबविला

चोरट्यांनी शामराव तायडे यांच्याकडील 30 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व 12 ग्रॅमची अंगठी असा एकूण 1 लाख 26 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ते दोघे चोरटे काळ्या रंगाच्या दुचाकीवर आले होते. त्यांच्यातील एक 45 ते 50 वयाचा तर दुसरा 35 ते 40 वयोगटाचे होते. आपली फसवणुक झाल्याचे कळताच त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार त्या दोघी दुचाकीस्वारांविरुद्ध पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com