हतनूरमध्ये ४१ टक्के जलसाठा

भुसावळ पालिका, रेल्वे व जळगाव एमआयडीसीसाठी सोडले आवर्तन
हतनूरमध्ये ४१ टक्के जलसाठा

भुसावळ (Bhusawal) प्रतिनिधी -

तालुक्यात या वर्षी उष्णतेने (heat) मोठ्या प्रमाणात उच्चांक गाठला आहे. त्या तुलनेत परिसरातील जलसाठ्यांवरही (water storage) परिणाम जाणवत आहे. दरम्यान तालुक्या्तील हतनुर धरणात (Hatnur Dam) मागील वर्षाच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक जलसाठा (More water storage) उपलब्ध आहे. तसेच भुसावळ पालिकेसह रेल्वे व जळगाव एमआयडीसीसाठी आवर्तन सोडण्यात आल्याची माहिती हतनूर धरणाच्या सुत्रांकडून देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील हतनुर धरणात (Hatnur Dam) सध्या ४०.३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. सध्या हतनुर धरणाची पाणी पातळी २११.०२० मीटर इतकी आहे. तर पाणी साठा २३६.०० दलघमी आहे. तर १३०.०० लाईव्ह स्टोरेज लाईव्ह स्टोरेज आहे. सध्याच्या परिस्थितीत धरणात ४०.३९ टक्के जल साठा होता. तो मागच्या वर्षी तब्बल १७.६१ टक्के इतका होता. त्यात पाणी पातळी २०९.३९५ मीटर, पाणी साठा १७७.९० दलघमी तर लाईव्ह स्टोरेज ४४.९० दलघमी इतका होता. मागील वर्षाच्या तुलनेत धरणात दुपटीपेक्षा अधिक जलसाठा (More water storage) उपलब्ध आहे.
आवर्तन सोडले
दरम्यान, भुसावळ पालिका, रेल्वे व जळगाव एमआयडीसी साठी पाण्याचे आवर्तन २१ रोजी सोडण्यात आले असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली. आगामी पावसाळ्यापर्यंत धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com