हतनूर धरण : रब्बी हंगामासाठी चार आवर्तने मिळणार

कालव्याच्या प्रकल्पस्तरीय पाणी वापर बैठकीत निर्णय
हतनूर धरण : रब्बी हंगामासाठी चार आवर्तने मिळणार

यावल - प्रतिनिधी Yaval

हतनुर कालव्याच्या प्रकल्पस्तरीय पाणी वापराची हातनुर धरणावर नुकतीच रब्बी हंगामाचे नियोजनासाठी बैठक घेण्यात आली सदर बैठकीत रावेर यावल चोपडा येथील पाणी वापर संस्थेचे संपूर्ण संचालक यावेळी उपस्थित होते. प्रकल्पस्तरीय...

अध्यक्ष सौ.कांचन ताराचंद फालक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कार्यकारी अभियंता शिंदे यांच्या सूचनेनुसार पाणी नियोजन ठरविण्यात आले सदर नियोजन करतांना गिरधर पाटील संचालक पाणी वापर संस्था यांनी पाणी देणेबाबत बैठकीत अमूल्य मार्गदर्शन केले.

चालू रब्बी हंगामामध्ये चार पाणी देण्यात यावे असे सुचवले तसेच कालवा स्तरीय अध्यक्ष चोपडा पाणी वापर संस्थेचे जगन्नाथ गंगाराम पाटीलसर, संचालक अतुल ठाकरे सह सर्व संचालक यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी जे.जी.पाटीलयांनी पाण्याची मागणी नोव्हेंबर च्या शेवटच्या महिन्यात केली होती चर्चेअंती सर्वानुमते चालू रब्बी हंगामासाठी चार आवर्तने नियोजित असून दर महिन्याच्या वीस ते तीस तारखेच्या दरम्यान रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याचे नियोजन यावल चोपडा येथील पाणी वापर संस्थेच्या संचालकांच्या मागणी नुसार ठरवण्यात आले.

तसेच या नियोजनात अध्यक्ष व कार्यकारी अभियंता यांनी संचालक मंडळांनी ठरविल्यानुसार मान्य केले तसेच भविष्यात पाणीवापर संस्था मजबूत होण्यासाठी पाणीवापर संस्थेचे जनक श्री.बेलसरे साहेब यांचे मार्गदर्शन कार्यशाळा कोरोनाची स्थिती निवडल्यावर चोपडा यावल रावेर मधील एका मध्यवर्ती ठिकाणी घेण्याची ठरले संचालकांनी केलेल्या वेळोवेळी सूचना व प्रश्न यांची दखल संबंधित कार्यकारी अभियंता यांनी घेतली त्यांच्या शंकेचे निरसनही केले अंतिम पाणी वापर संस्थेच्या बैठकीत जे जी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

एकही कनिष्ठ अभियंता नाही

यावल उपविभागाकडे वाघूर धरण जोडण्यात येत आहे, परंतु या उपविभागाकडे एकही कनिष्ठ अभियंता नाही म्हणून हस्तांतरण करताना सर्व कनिष्ठ अभियंता व कर्मचारी यांच्यासह यावल उपविभागात जोडण्यात यावे जेणेकरून धरणाची सिंचनासाठी नियोजन सोयीचे होईल व शेतकऱ्यांनाही त्याचा सोयीस्कर रीत्या फायदा घेता येईल.

आमदार शिरीष चौधरी यांना निवेदन

यावल नगर परिषदेतर्फे यावल शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पाणी आरक्षणानुसार हतनूर कालव्यातून पाणी त्वरित सोडण्यात यावे असे नगर परिषदेतर्फे कालच आमदार शिरीष दादा चौधरी यांना नगराध्यक्ष श्रीमती नौशाद मुबारक तडवी यांना निवेदन सादर केले.

पाणी दोन दिवसाच्या आत सुटेल पाणी

यावल नगरपालिकेला चार ते पाच दिवस पाणी पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने दिवाळीच्या सणाच्या कालावधीत नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी हातनुर कालव्यातून पाण्याची मागणी केली आहे, त्यानुसार आमदार शिरीष चौधरी यांनी संबंधित विभागाला पत्र देऊन ते पाणी दोन दिवसाच्या आत कार्यकारी अभियंता शिंदे यांच्या आदेशान्वये सोडण्यात येणार असल्याचे उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग यावल एस एच चौधरी यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com