
अमळनेर Amalner
तालुक्यातील निम येथील माहेर असलेल्या विवाहितेने (married) सासरच्या मंडळींविरुद्ध (Against the in-laws) छळ (torture) केल्याची तक्रार (complaint) दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निम येथील पूजा हीचा विवाह धुळे येथील शिवम याच्यासोबत झाला होता. लग्नाच्या तीन महिन्यानंतर सासरच्या मंडळींनी हुंडा कमी दिला, मानपान केला नाही म्हणून छळ सुरू केला. तसेच घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेवून ये असा तगादा लावला.
त्यानतंर पतीने 27 ऑगस्ट 22 रोजी विवाहितेला माहेरी निम येथे आणून सोडले. महिला सहायता कक्ष, जळगाव यांच्यामार्फत वाद मिटत नसल्याने विवाहितेने मारवड पोलीसात पती शिवम पाटील, सासरा नंदकिशोर पाटील, सासू बन्सुबाई पाटील, दिर मनीष पाटील, मामसासरे संभाजी पवार, मावससासू सुपाबाई पाटील यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यावरून मारवड पोलीसात भा. द. वि. कलम 498 अ, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार मुकेश साळुंखे हे करीत आहेत.