बाभळेनाग येथील आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याचा छळ : एसपींना निवेदन

बाभळेनाग येथील आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याचा छळ : एसपींना निवेदन
USER

पारोळा Parola

तालुक्यातील बाभळेनाग येथे आंतरजातीय विवाह (Interracial Marriage) केला म्हणून मुलगी तसेच मुलाच्या कुटुंबियांना मुलींच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांकडून मारहाण करत छळ (Harassment) केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे. दरम्यान दाम्पत्याने पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) डॉ. प्रवीण मुंढे (Dr. Praveen Mundhe)यांना निवेदन दिले असून कारवाईची मागणी केली आहे.

याबाबत माहिती अशी की, मुलगा व मुलगी दोघेही सज्ञान आहेत. १५ ऑगस्टला दोघांनी आंतरजातीय विवाह केल्यानंतर पारोळा पोलिसात हजर झाले. याठिकाणी पोलिसांनी मुलगा व मुलगी दोघांकडील आई वडीलांना बोलाविले. मुलगी सज्ञान असल्याने तिने पतीसोबत राहण्याचे सांगितल्यावर कायदेशीररित्या नोंदही करण्यात आली. मात्र आता मुलगी परत द्या, म्हणत मुलीचे वडील तसेच नातेवाईक मुलाला तसेच त्यांच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करत छळ करत आहे.

गावात राहायचे नाही म्हणत गाव सोडले नाहीतर जीवे मारणयाची धमकीही मुलीच्या कुटुंबियांकडून दिली जात आहे. दोघांनी एकमेकांच्या संमतीने कायदेशीररित्या हा विवाह केला असून आम्हाला न्याय मिळावा मिळावी अशी मागणी दाम्पत्याने केली आहे. याबाबत पारोळा पोलिसात तक्रार दिल्यावर पोलिसांकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप तरुणाने केला आहे. कारवाईच्या मागणीसाठी दाम्पत्याने पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com