नोकरीचे आमिष दाखवत विवाहितेवर अत्याचार

चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हां दाखल
नोकरीचे आमिष दाखवत विवाहितेवर अत्याचार

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी -

शहरातील लक्ष्मीनगर येथे राहणार्‍या एका २९ वर्षीय घटस्फोटीत महिलेला (married woman) नोकरीचे आमिष (lure of a job) दाखवून, तिच्यावर वेळेावेळी जबरदस्तीने अत्याचार (Harassment) केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच महिलेच्या असहायतेचा फायदा देवून, एक लाख रूपयाची लुट देखील आरोपीने केली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस (police) स्टेशनला इस्लामपुरा राहणार्‍या आरोपी विरोधात गुन्हां (crime) दाखल करण्यात आला आहे.

शहरातील लक्ष्मीनगर येथे राहणार्‍या २९ वर्षीय महिलेशी आसिफ हुसेन खान (४५) रा.नवा इस्लामपुरा, छोटी गुजरी, चाळीसगाव. याने महिलेच्या असहायतेचा फायदा घेवून, तिच्याशी ओळख निर्माण केली. तिला नोकरी लावण्याचे आमिष दाखवत एक लाख रूपये घेतले, शिवाय जुन २०२१ पासून शिवीगाळ करुन, जिवे ठार मारण्याची धमकी देत, तिच्याशी जबरदस्तीने नैसर्गिक व अनैसर्गिकरित्या अत्याचार केला.

या सर्वाला कंटाळून शेवटी महिलेने घर सोडून अन्य ठिकाणी वास्तवास गेली. तेथेही तपास करत पोहचत आसिफ खान याने सदर महिलेला शारिरिक सबंध कायम न ठेवल्यास तिला व तिच्या मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला.

अखेर या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या महिलेने शहर पोलिस स्टेशनला धाव घेतली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव पोलीस स्टेशनला आसिफ हुसेन खान यांच्याविरोधात भादवी कलम ३७६ (२), (एन), ३७७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बिरारी हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com