मुलगा होत नाही म्हणून गणेश कॉलनीतील विवाहितेचा छळ

पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल
मुलगा होत नाही म्हणून गणेश कॉलनीतील विवाहितेचा छळ

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

मुलगा होत नाही (boy is not born)यासह चारित्र्यावर संशय(Doubt over character), माहेरुन पाच लाख रुपये आणावेत अशा वेगवेगळ्या कारणांवरुन गणेश कॉलनी येथील माहेर असलेल्या सोनिया आनंद मरलेचा वय 30 या विवाहितेचा(Married) छळ (Persecution) करणार्‍या पतीसह सासरच्या (Father-in-law with husband) सहा जणांविरोधात गुरुवारी जिल्हापेठ पोलीस ठाणयात (District Peth Police) गुुनहा दाखल झाला आहे.

सोनिया आनंद मरलेचा वय 30 रा. श्रीनिवास कॉलनी, गणेश कॉलनी जळगाव यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार असे की, त्यांचा विवाह 22 एप्रिल 2013 रोजी जालना येथील आनंद कचरुलाल मलरेचा यांच्यासोबत झाला आहे. लग्नानंतर काही दिवस चांगले गेले. त्यानंतर किरकोळ कारणावरुन पती तसेच सासू सासरे यांनी व्यवसायासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावेत या कारणावरुन सोनियाचा छळ करण्यास सुरुवात केली.

दरम्यान काळात सोनिया यांना दोन मुली झाल्या. वंशाचा दिवा मुलगा पाहिजे, त्या कारणावरुन शिवीगाळ करत मारहाण करत शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच घटस्फोट द्यावा म्हणून सासू सासर्‍यांसह तिन्ही नणंद यांनीही सोनियाचा हिस शिवीगाळ करत धमक्या दिल्या.

सोनियाचे पती आनंद मलरेचा यांनी कर्ज घेतलेले लोक घरी येवून तगादा लावत असल्याने आनंद मलरेचा हे सोनियासह दोन्ही मुलींना सोबत घेवून पुण्याला राहायला. यादरम्यान सोनिया हिस पतीच्या मोबाईल पाहिल्यानंतर पती आनंद हे इतर लोकांना स्त्रिया पुरविण्याचा व्यवसाय करत असल्याचे समजले.

ही बाब सोनिया हिस समजल्याने त्यावरुन पती आनंद याने सोनिया हिस मारहाण करत शारिरीक व मानसिक छळ सुरुच ठेवला. यादरम्यान अंगावरील दागिणे काढून घेत, दोन्ही मुलींसह सोनिया हिला घरातून हाकलून दिले.

छळ असहय् झाल्याने सोनिया ह्या मुलींसह माहेरी राहत आहे. याप्रकरणी सोनिया यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुरुवार, 21 ऑक्टोंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पती आनंद , सासू पुष्पा मलरेचा, सासरे कचरुलाल मरलेचा, नणंद सपना सुयोग चौधरी रा. यशगाव ता. कोपरगाव जि. नगर, कविता राजवर्धन श्रीश्रीमाळ रा. वजीराबाद, नांदेड व भावना जितेश मुथा रा. खराडी या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप पाटील हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com