
जळगाव jalgaon
शहरातील अयोध्या नगरातील (Ayodhya nager) माहेरवाशीन असलेल्या जयश्री निलेश कोळी (वय-33) या विवाहितेला (Married) मुलगी झाली (girl was born)मुलगा झाला ()boy was not born नाही, माहेरुन काही आणत नाही यासह भावाच्या लग्नात जावायाला सोन्याची अंगठी दिली नाही म्हणून पतीसह सासरच्यांकडून (From in-laws including husband) छळ (torture) केला जात होता.
विवाहितेच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे त्यांना विचारणा केल्यामुळे त्यांना मारहाण देखील केली. त्याचप्रमाणे विवाहिता गरोदर असतांना तीची प्रकृती बरी नव्हती तरी देखील सासरच्यांकडून त्यांच्यावर औषधोपचार न करता त्यांच्याकडून घरातील कामे करुन घेतली जात होती. हा त्रास असह्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या.
अखेर त्यांनी रविवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पती निलेश सुभाष कोळी, सासरे सुभाष तानकू कोळी, सासू शोभा सुभाष कोळी सर्व रा. गायत्री अपार्टमेंट टोकरखाडा सिल्व्हासा दादारा नगर हवेली यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.