घरासाठी दहा लाखाची मागणी करून विवाहितेचा छळ

पती सासू सासरे यासह आठ संशयितांवर गुन्हा
घरासाठी दहा लाखाची मागणी करून विवाहितेचा छळ

एरंडोल Erandol- (वार्ताहार )

माहेराहून नवीन घरासाठी (house) दहा लाख रुपयांची मागणी (demanding Rs 10 lakh) करून केवळ १९ वर्षीय विवाहितेच्या (married woman) चारित्र्यावर संशय घेवून शिवीगाळ व मारहाण (Harassment) केल्याच्या आरोपावरून विवाहितेचा पती,सासू,सासरे,नणंद,मावस सासरे व मावस सासू आशा आठ संशयितांविरोधात विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गांधीपुरा भागातील राहिवाशी विजय नाईक यांची मुलगी निकिता यांचा विवाह सुनील सोपान घ्यार (रा.धोंडखेड जि.बुलढाणा) यांचेशी एका वर्षा पूर्वी ४ जून २०२१ रोजी उमरदे ता.एरंडोल येथे मोठ्या थाटामाटात झाला. वडील विजय नाईक यांनी अडीच लाख रुपये रोख व सोने आणि चांदीचे दागिने स्रीधन म्हणून दिले होते.तसेच विवाहानंतर मूळ लावण्याच्या प्रसंगी फ्रीज,गोदरेज कपाट,पलंग व संसार उपयोगी वस्तू दिल्या होत्या.जावई नाेकरीस असल्यामुळे विजय नाईक यांनी विवाहासाठी लाखो रुपये खर्च केले होते.विवाहितेचे पती सुनील सोपान घ्यार हे जळगाव येथे वीज वितरण कंपनीत नोकरीस असल्यामुळे ते धोंडखेड ते जळगाव असे ये जा करीत होते.

विवाह झाल्यानंतर सासरच्या लोकांनी निकिता हिस केवळ एक महिना चांगली वागणूक दिली.त्यानंतर सासू आशाबाई सोपान घ्यार,व नणंद सविता सोपान घ्यार यांनी किरकोळ कारणावरून निकिता हिचेशी वाद घालण्यास सुरुवात करून त्रास देण्यास सुरुवात केली.विवाहितेचे पती सुनील घ्यार याना निकिता बद्दल खोटे सांगत असल्यामुळे पती शिवीगाळ करून मारहाण करू लागले.निकिता माहेरी बोलण्यास देखील बंदी घालण्यात आली.निकिता हिस शेतीचे काम येत नसतांना देखील शेतात कामासाठी नेऊन काम येत नसल्याच्या कारणावरून शेतातच शिवीगाळ व मारहाण करण्यात आली.

पती सुनील घ्यार यांनी निकिताच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे तिला कोणाशीही बोलू दिले जात नव्हते.जळगाव येथे नवीन घर घेण्यासाठी माहेराहून दहा लाख रुपये अशी मागणी पती व सासरचे लोक करून लागले आणि याच कारणावरून तिचा शारीरिक व मानसीक छळ केला जात असे.विवाहानंतर केवळ एक महिन्यात निकिता माहेरी आल्यानंतर निकिताने सासरी होणा-या त्रासाबद्दल वडील विजय नाईक यांनी माहिती दिली.

वडिलांनी समजूत घातल्यानंतर निकिता पुन्हा सासरी गेली.तुझ्याशी विवाह करून आमचे नुकसान झाले असून आम्हाला हुंडा कमी दिला म्हणून तू फारकत घे अशी धमकी सासरच्या लीकानी दिली.रक्षाबंधनासाठी माहेरी आली असता सासू आशाबाई घ्यार यांनी माहेराहून पाच लाख रुपये घेवून येण्याचे सांगितले.आगस्त महिन्यात निकिता व त्यांचे पती सुनील घ्यार हे जळगाव येथे राहण्यासाठी आले असता मावस सासू सुरेखा नामदेव घुगे,मावस सासरे नामदेव दगडू घुगे,छाया सुरेंद्र नाईक हे घरी येवून नवीन घरासाठी दहा लाख रुपये तुझ्या वडिलांकडून आण असे सांगून टोचून बोलू लागले.

पती सुनील यांनी निकीतास अनेक वेळा घराबाहेर काढून मी दुसरे लग्न करेल अशी धमकी दिली होती.९ जानेवारी २०२२ रोजी माहेरून दहा लाख रुपये घेवून या मागणी साठी सासरच्या लोकांनी घराबाहेर काढले आणि पती सुनील याने निकीतास माहेरी पोहोचवून दिले.याबाबत निकिता नाईक यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती सुनील घ्यार,सासरे सोपान घ्यार,सासू आशाबाई घ्यार,नणंद सविता घ्यार,मावस सासरे नामदेव घुगे,मावस सासू सुरेखा घुगे,मावस दीर सचिन घुगे,मावस सासू छाया नाईक यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com