अमावस्येला पो.नि. के. के. पाटील यांच्या विरोधात तक्रार

हिन्दु संघटना एकवटवत आहे, जिल्ह्याभरातून निलंबनाची मागणी
अमावस्येला पो.नि. के. के. पाटील यांच्या विरोधात तक्रार

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव शहरातील (Hanuman Singh Rajput Nagar) हनुमानसिंग राजपूत नगर परिसरातील संतोषी माता मंदिराजवळ (Kirtan) कीर्तन सुरु असताता, पोलीस निरीक्षक के.के.पाटील (Police Inspector K K Patil) यांनी त्याठिकाणी जाऊन सदर माईक बंद केला तसेच वारकरी संप्रदायात पवित्र मानल्या गेलेल्या नारदाच्या गादीवर बुटासहित पाय ठेवले, तसेच तेथे उपस्थित किर्तनकार महाराजांसह वारकऱ्यांना दमबाजी केली. यामुळे संपूर्ण वारंवारी संप्रदायाच अवमान झाला असून राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. के.के.पाटील यांच्या निलंबनाच्या मागणीने जोर पकडला आहे. आज ऐन अमावस्येच्या दिवशी के.के.पाटील यांच्या विरोधात चाळीसगाव येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. राम कृष्णा पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी (Subdivisional Police Officer) यांच्या कडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे हे प्रकरण चिघळत असल्याचे दिसत असून हळूहळू याप्रकरणात हिन्दु संघटना देखील एकवटत आहे.

अमावस्येला पो.नि. के. के. पाटील यांच्या विरोधात तक्रार
Video चाळीसगाव : नारदाच्या गादीचा पोलीस निरिक्षाकडून अवमान

शहरातील हनुमानसिंग नगरातील सप्तश्रृंगी मंदिर परीसरात रात्री सुरु असलेल्या किर्तन सोहळ्यात शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांतीलाल के. के. पाटील यांनी सुरु असलेल्या किर्तनाच्या कार्यक्रमात माईक पर्यंन्त जावून नारदाच्या गादीवर बुटासकट पाय ठेवून किर्तनातील मृदुंग वादक ह. भ. राम महाराज यांना धमकावर्‍याचा प्रकार केला होता. या प्रकरणी किर्तनकार ह. भ. प. सोमनाथ महाराजांसह मृंदुंगवादक ह. भ. प राम महाराज आणि किर्तन सोहळ्यासाठी आलेल्या वारकरी संप्रदाय आणि जमलेल्या जनसामान्यांना धमकावल्या प्रकरणी आज दि,३० रोजी ह. भ. प. राम महाराज यांनी पो. नि. के. के. पाटील यांच्या विरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी व अप्पर पोलीस अधिकारी यांचेकडे तक्रार अर्ज दिला आहे.

अमावस्येला पो.नि. के. के. पाटील यांच्या विरोधात तक्रार
रमजान ईदसह अक्षय तृतीयेचा सण एकात्मतेच्या भावनेने साजरा करा!

याप्रसंगी त्यांचे समवेत विश्वहिंदू परीषद तसेच अन्य धार्मीक संघटनांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. काल याप्रकरणी राष्ट्रीय जनमंच पक्षातर्फे निषेध करण्यात येवून त्वरित निलंबन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवदेनही राष्ट्रीय जन मंच (सेक्युलर ) तर्फे आज दि,२९ रोजी उपविभागीय पोलीस आधिकारी यांना देण्यात आले आहे. आज पुन्हा के.के.पाटील यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल झाला आहे. तर जिल्ह्यातील इतर ठिकाणी देखील के.के.पाटील यांच्यावर कारवाईसाठी वारकरी संप्रदायातर्फे निवेदन दिली जात आहे. त्यामुळे आता के.के.पाटील यांना नारदाच्या गादीचा अपमान करणे चांगलेच महागात पडणार असल्याचे दिसत आहे. हिन्दु धर्मात आमवस्याला फार महत्व आहे. आज चैत्र आमवस्या आहे. परंतू शनिवार असल्यामुळे या आमवस्याला फार महत्व आहे. आज नेमके आमवस्याच्या दिवशीच के.के.पाटील यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल झाल्यामुळे आमवस्याचे शुक्लकाष्ट लागत की काय अशी चर्चा होत आहे.

Related Stories

No stories found.