मोक्का कारवाईनतंरही चाळीसगावात हॉफमर्डर

एकमेकांकडे बघण्यावरुन तरुणावर चॉपरने वार
मोक्का कारवाईनतंरही चाळीसगावात हॉफमर्डर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

चाळीसगाव शहरात बामोशी बाबांच्या तलवार मिरणुकीत एकमेकांकडे बघण्याच्या क्षुल्लक करणावरुन एकावर चॉपरने सपा-सप वार करण्यात आले. हि घटना दि. ०८ रोजी घडली असून याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चाळीसगाव पोलिसांंनी ११ आरोपींवर मोक्का व एकावर एमपीडीए अंतर्गत कारवाई केल्यानतंर देखील हॉफमर्डरची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, दिनेश शिवाजी कोर,( वय २१ वर्षे) धंदा भाजीपाला विक्री, रा. हरगीरबाबा नगर, पाटनादेवी रोड, चाळीसगाव, जिल्हा जळगाव याने दिलेल्या फिर्यादीनूसार त्याच्या घराजवळ हरगीरबाबा नगर येथे मनोज लोटन भोई (वय-११) हा कुटुबांसह राहतो. लहानपनापासुन तो दिनेशचा मित्र आहे. तसेच हरगीरबाबा नगरमध्ये कन्हैय्या उर्फ कनु, शेषराव देशमुख, शुभम राजु वारी हे देखील त्यांचे परिवारासह राहतात. दि, ०७/०२/२०२३ रोजी रात्री ०७.३० वा दिनेश व मनोज लोटन भोई, दिपक शांताराम झोडगे, हर्षल दिपक झोडगे असे सर्व जण हरगीरबाबा नगरमधुन पिरमुुसा कादरीबाबांच्या दर्गामध्ये सुरु असलेल्या उरुस व तलवार मिरवणूक बघण्यासाठी जात असताना, पाटनादेवी रोडवर आले, त्यावेळी पॅशन प्रो मोटारसायकलवर शुभम राजु, वारी व कन्हैय्या उर्फ कनु देशमुख असे पाटणादेवी रोडने समोरुन येत होते. त्यावेळी दिनेश व मनोज हे त्यांच्या मोटारसायकलकडे बघत असतांनाच शुभम बारी मोटारसायकल घेवून त्याच्याकडे आले, व गाडी थांबवली.

तेव्हा कन्हैय्या ऊर्फ कनु मनोजला म्हणाला की, माझ्याकडे का बघतो, तेव्हा मनोज त्याला दिनेश म्हणाला कि, शिव्या देवू नको, तुझ्याकडे बघायला तुला काय सोने लागले आहे, त्यानंतर कन्हैय्या गाडीवरुन खाली उतरला व त्याने कमरेला लावलेला चॉपर बाहेर काढला व मनोज यास मारण्यासाठी आला. तेव्हा दिपक शांताराम झोडगे याने कन्हैय्या ऊर्फ कनु याला आवरले. त्यांनंतर सर्वानी मनोजला घेवून दर्ग्याकडे निघालेे. शुभम वारी पुन्हा मोटारसायकलवरुन कन्हैय्याला घेवून आला. त्यानंतर शुभम वारी कन्हैय्याला बोलला कि, मार साल्याला त्यानंतर कन्हैय्या गाडीच्या खाली उतरला व याला आज संपवतोच असे बोलून मनोजच्या गळ्यावर वार केला. त्याचवेळी मनोजने त्याचे दोन्ही हात समोर आणल्याने त्याच्या दोन्ही हातांच्या मनगटावर चॉपर लागला. त्यानंतर कन्हैय्याने मनोजच्या खांदयावर वार केला. त्यानंतर पुन्हा कन्हैय्याने मनोजच्या पोटात वार केला.

तेव्हा मनोजने पाय वर केल्याने तो वार कमरेच्या खाली मांडीवर लागला. त्यावेळी सर्व घाबरले असल्याने व त्याचे हातात चॉपर असल्याने आम्ही कन्हैय्याला पकडायची किंवा आवरण्याची हिम्मत केली नाही. परिसरातील नागरीक देखील तेथुन घावरुन पळु लागले. त्यानंतर शुभम वारी कन्हैय्याला गाडीवर बस म्हणाला व ते दोघे पाटणादेवी रोडच्या दिशेने पळून गेले. मनोजला झालेल्या जखमामधून रक्तश्राव होत असल्याने आम्ही तेथुन मोटारसायकलवर जाणारा बंटी राजपुत रा. हरगीरबाबा नगर याची मोटारसायकल थांबवून त्याचे मोटारसायकलवर मनोज याला मध्ये बसवून त्याचे पाठीमागे दिपक झोडगे बसला. मनोजला आम्ही उपचारकामी देवरे हॉस्पीटलला घेवून गेलो. सध्या मनोज याचेवर देवरे हॉस्पीटल येथे ऑपरेशन व उपचार सुरु आहेत. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला दिनेश शिवाजी कोर याच्या फिर्यादीवरुन कन्हैय्या ऊर्फ कनु शेषराव देशमुख व शुभम राजु बारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com