
चिंचोली Chincholi ता. यावल
येथे आज दि.31 रोजी संध्याकाळी चक्रीवादळाचा (cyclone) तडाखा बसला. चिंचोली सह परीसरात शेती केळी बागा (Banana orchard) आणि वादळी पावसामुळे मोठें घरांची (houses) पत्रें उडून लाखो रूपयांची नुकसान (Damage) झाले आहे.
विजेचे खांब वाकले असुन विज मंडळाचे ही नुकसान झाले आहे.विज पुरवठा खंडीत (Power outage) झाला असून परीसरात शेकडो वृक्ष वादळी वाऱ्यामुळे आडवी झाली असून रस्त्यावर ही मोठी वृक्ष कोलमडून पडली आहे.नुकसानीचा आकडा मात्र समजू शकला नाही.पंचनामे झाल्यावरच नुकसानीचा अंदाज येणार आहे.
हरभरा आकाराची गार
अचानक झालेल्या या बेमोसमी पावसाने चिंचोली वासियांना चांगलेच झोडपून काढले.जवळपास पंधरा ते वीस मिनिटे गार (Hail) पडली.केळी बागांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.