पाच दरोडेखोरांचा हैदोस; तरुण जखमी

 पाच दरोडेखोरांचा हैदोस; तरुण जखमी

भुसावळ Bhusaval। प्रतिनिधी

तालुक्यातील गोजोरे येथे 22 रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास पाच अज्ञात चोरांनी (Robbers) धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांच्या झटापटीत युवक जखमी (Young injured) झाल्याची घटना घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील गोजोरा येथील रहिवाशी लीलाधर धोंडू ठोंबरे हे पत्नीच्या मृत्यूनंतर कधी मुलाकडे मुंबई तर कधी मुलीकडे जळगाव येथे रहिवास करतात. ते काही दिवसापासून गावावर नसल्याने त्यांचे घर बंदच होते. चोरट्यांनी याची संधी साधत पाच दरोडेखोरांनी त्यांच्या घरावर हल्लाबोल केला. मात्र त्या क्षणी त्यांच्या घरासमोरील रहिवाशी अनिल वारके यांना जाग आल्याने त्यांनी या प्रकरणाची ठोंबरे यांचे पुतणे राजू ठोंबरे हे शेजारी राहत असल्याने त्यांना फोन करून कळविले.

राजू ठोंबरे हे आपल्या दोन मुलांसह रात्री दीड वाजता उठून बाहेर आले असता त्यांना सदरील प्रकार निदर्शनास आला. त्याचवेळी समोरील रहिवाशी अनिल वारके हे सुद्धा घराबाहेर येऊन यांनी दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोरांनी पळ काढताना लोखंडी टिक्कम मारून फेकला आणि ते पळ काढत असताना त्यांना यांनी मागून विटा मारण्याचा प्रयत्न केला. त्यात एक दरोडेखोर खाली पडला असता. त्याला राजू ठोंबरे यांचा लहान मुलगा कुंदन ठोंबरे याने पकडण्याचा प्रयत्न केला.

दरोडेखोरांचा पाय त्याच्या हातात लागल्याने दरोडेखोराला पळने मुश्किल झाले. मात्र लागलीच दरोडेखोराने कुंदन याच्यावर स्क्रू ड्रायव्हर ने दोन ठिकाणी मारा केला आणि कुंदन याला रक्तबंबाळ केले. कुंदन हा रक्तबंबळ अवस्थेत पाहताना समोरचे आवाक झाले. आणि याची संधी पाहून दरोडेखोरांनी मोटरसायकलवरून पळ काढला.

यावेळी दरोडेखोर हे पूर्ण माहितीनुसार गावात आले होते मात्र त्यांचा चोरी करण्याचा प्रयत्न असफल झाला. त्यातील एका दरोडेखोराशी टोपी निघाली असता त्याला मोठी दाढी असल्याचे निदर्शनास आले असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जर भर गावामध्ये अशा प्रकारच्या चोरी करण्याचे चोरांचे धाडस वाढले का त्यांना गावातून कुणाची साथ आहे का?असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जखमी कुंदन यांच्यावर येथील न.पा. दवाखान्यात उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com