भुसावळ मार्गावरील ‘हा’ टोल नाका 3 ऑक्टोबरपासून होणार बंद

वाहनधारकांना मोठा दिलासा : आ. चंद्रकांत पाटील यांनी केली होती तक्रार
भुसावळ मार्गावरील ‘हा’ टोल नाका 3 ऑक्टोबरपासून होणार बंद

फेकरी, Fakeri ता.भुसावळ । प्रतिनिधी
अवघ्या 19 किलोमीटरच्या अंतरावर असूनही नशिराबाद व फेकरी (Nashirabad and Fekri) या दोन ठिकाणी टोल घेतला (Toll taken) जात असल्याने वाहनधारकांना मोठा भूर्दंड (Roadblocks for motorists) सोसावा लागत होता. चिखली ते तरसोद (Chikhli to Tarsod) महामार्गाचे चौपदरीकरण (Four-lane highway) एकाच मार्गावर असतानाही सुरू असलेली लूट थांबवण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (National Highway Authority) फेकरी टोलनाक्याची (Fekri Tollnakaya) मुदत संपत (expiration date) असल्याने 3 ऑक्टोंबरपासून हा टोल बंद (Order to stop toll) करण्याचे आदेश काढल्याने वाहनधारकांना दिलासा (Relief to motorists) मिळाला आहे.

चिखली ते तरसोद दरम्यान महामार्ग प्राधिकरणाने चोपदरीकरणाचे काम केले. मात्र 19 किलोमीटरच्या अंतरात वाहनधारकांना दोन ठिकाणी टोल भरावा लागत होता. फेकरी टोल नाक्याजवळ महामार्गावरच मोठ-मोठ्या खड्ड्यांतून वाहनधारकांना प्रवास करावा लागत असून महामार्गावर दुहेरी वाहतुकीसाठी फेकरी उड्डाणपूल आहे. तर दुसरी बाजूला दुहेरी पुलाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही, असे असतानाही टोल सुरूच होता.

वरणगाव, मुक्ताईनगर भागातून जळगावला जाणार्‍या वाहनधारकांना फेकरी व नशिराबाद असे दोन टोल भरावे लागत होते. फेकरी टोल नाक्यावरील अधिकारी व कर्मचारी मनमानी कारभार करत ऑनलाईन प्रोब्लेम्सच्या नावाखाली अर्धा ते एक तास ट्राफिक जाम करतात व यामध्ये शाळकरी विद्यार्थी, रुग्ण, नोकरदार वर्ग आणि वाहनधारकांना व प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करत प्रवास करावा लागत होता. याबाबतची तक्रार आ. चंद्रकांत पाटील यांनी तोलनाका बंद करण्यासाठी केली होती.

गेल्या वर्षभरापासून फेकरी टोल नाक्याच्या हद्दीतील रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले. हा रस्ता तयार करण्याबाबत कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. खड्डे असताना देखील वाहनधारकांना टोल भरावा लागत आहे. आता हा टोल बंद झाल्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच रखडलेल्या फेकरी उड्डाणपुलाचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे.


फेकरी टोल नाक्याची मुदत संपल्याने हा टोल नाका 3 ऑक्टोबर पासून बंद केला जाणार आहे. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आदेश प्राप्त झाले आहेत. उड्डाणपूलाचे रखडलेले कामही आता गती घेत आहे. लवकरच चौपदरी उड्डाणपूल तयार होईल, असे महामार्ग प्राधिकरणाचे चंद्रकांत सिन्हा म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com