पाठलाग करुन ८२ लाखांचा गुटखा केला जप्त

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई
पाठलाग करुन ८२ लाखांचा गुटखा केला जप्त

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी महिनाभरापूर्वीच चाळीसगाव-मालेगाव रोडवर ९२ लाख ३४ हजार रुपये किमंतीचा गुटखा व कंटेनर असा एकूण १ कोटी १२ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याचे प्रकरण ताजे असताना, आता पुन्हा ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत, चाळीसगाव-मालेगाव रोडवरच बेलगंगा कारखान्याजवळ एक कंटेनरचा पाठलाग करुन, ८२ लांख २५ हजार १०० रुपयांचा गुटखा (Gutkha) व कंटेनर असा एकूण १ कोटी २ लाख २५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव ग्रामीण पोलीस तपासकामी चाळीसगाव-मालेगाव रोडवरुन जात असताना, त्यांना बेलगंगा कारखान्या जवळून भरधाव वेगाने जात असलेला कंटनेर (Container) (क्र. एच.आर.३८ ए.बी.६०९६) दिसला, त्यानी कंटनेरचा पाठलाग करुन चाळीसगाव-मालेगाव फाट्यावर थांबवले. कंटनेरमधील मालाबाबत पोलिसांनी चालकास विचारणा केली असता, त्याने सुरुवातीला उडावा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी कंटनेरची तपासणी केली असता, त्यात गुटखा आढळुन आला.

कंटनेर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आनुन पंचनामा केला असता, त्यात १३० प्लास्टीक बारदानात ८२ लाख २५ हजार १०० रुपयांचा गुटखा आढळुन आला. पोलिसांनी गुटखा व कंटेनर असा एकूण १ कोटी २ लाख २५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरची चालकावर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास उपनि.लोकेश पवार करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पो.नि.संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.रमेश चव्हाण, धरमसिंग सुंदरडे, लोकेश पवार, पोना.नितीन आमोदकर, गोवर्धन बोरसे, शांताराम पवार, प्रेमसिंग राठोड आदिच्या पथकाने केली आहे. दरम्यान लागोपाठ होत असलेल्या कारवाई व गुन्हांच्या उकलमुळे चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचे जिल्हाभरात कौतूक होत आहे.

Related Stories

No stories found.