वाकोद-पहूर रस्त्यावर गाडीसह साडेचौदा लाखांचा गुटखा जप्त

...अखेर 24 तासांनंतर गुन्हा दाखल; मोठ्या रॅकेटचा संशय
वाकोद-पहूर रस्त्यावर गाडीसह साडेचौदा लाखांचा गुटखा जप्त

वाकोद, ता. जामनेर । (Wakod) वार्ताहर

जळगाव-औरंगाबाद महामार्गावर वाकोदजवळ दि. 2 रोजी बोलेरो पिक अप गाडी सोडून चालक फरार झाला होता. या घटनेनंतर 24 तासात पोलीसात गाडी चालक व मालक यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गाडीसह तब्बल 14 लाख 60 हजार रुपये किंमतीचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला असून पहुर पोलीस ईश्वर देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोलेरो गाडी मध्ये 7 लाख 68 हजार रुपये किमतीचा राजविलास गुटखा व एक लाख 92 हजार रुपये किंमतीचा जाफरानी जर्दा व पाच लाख रुपये किंमतीची बोलेरो पिक अप गाडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामागे मोठे रॅकेट असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे

जळगाव औरंगाबाद महामार्गावर दि. 2 रोजी वाहतूक पोलिसांच्या तपासणी दरम्यान संध्याकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान पिंपळगाव पळसखेडा फाट्याजवळ जळगाव वाहतूक पोलिसांनी बोलेरो गाड़ी (क्र. एम. एच. 19 सी. वाय. 6881) अडवून चौकशी केली. चालकाची संशयास्पद वागणूक आढळून आली. गाड़ी काय माल आहे? असे विचारताच वाहन चालकाने तेथून धूम ठोकण्याचा प्रयत्न केला त्याचा पाठलाग करत वाहतूक पोलिस ही मागे गाड़ी घेऊन निघाले. बेदरकारपणे दोघांनी वाहने भर रस्त्यावर चालविल्याचे प्रत्येक्ष दर्शीनी सांगितले, धोकादायक पणे पिकअपच्या चालकाने यू टर्न घेऊन महामार्गावर गाड़ी लावून शेतातून मार्ग काढीत पळ काढला. यानंतर पहुर पो.स्टे. चे पोलिस घटना स्थळी हजर झाले असता जागेवर पंचनामा करा अशी मागणी करुन देखील त्यांनी गाडी पो. स्टे. ला न्यावी लागेल असे सांगितले.

पत्रकारांना चूकीची वागणूक

घटनास्थळी पंचनामा व्हावा व गाड़ीत नेमके काय आहे? हे समजण्यासाठी सांगितले असता आलेल्या पहूर पो स्टे चे पोलिस अधिकारी यांनी पत्रकारांना तुम्ही फिर्याद द्या, तुम्ही पंच व्हा तुम्ही गाडी टो करण्याची व्यवस्था करा अशी आधिकारी यांनी अशी भाषा वापरली पोलिसांनी पत्रकारांना सहकार्य न केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com