
भुसावळ Bhusawal । प्रतिनिधी
येथील हॉटेल तनारीकासमोर, साक्री फाट्याजवळ, रास्तिपुरा शिंधी कॉलनी मागे बर्हाणपूर (मध्यप्रदेश) येथून येणार्या पांढर्या रंगाच्या चार चाकी कारसह केसरयुक्त विमल पान मसाला (Gutkha)असा एकुण 4 लाख 36 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना मिळून आला असून एका संशयीताला ताब्यात घेतले आहे.
9 रोजी येथील हॉटेल तनारीका समोरील साक्री फाट्याजवळ केसरयुक्त विमल पान मसाला महाराष्ट्र राज्यात विक्री व बाळगण्यात प्रतिबंध असलेले मानवी जीवनात अपायकारक असलेला तंबाखूजन्य सुगंधित पान मसाला संशयित आरोपी राहुल कुमार मनोहरलाल साधवनी (वय 30 वर्ष, रा.रास्तीपुरा, सिंधी कॉलनीमागे बर्हाणपूर म.प्र.) हा बर्हाणपूर येथून भुसावळच्या दिशेने पांढर्या रंगाची चार चाकी क्र. एम.एच. 19 सी.एफ. 1620 मध्ये घेऊन येत असल्याच्या गोपनीय माहिती मिळाली.
बाजारपेठ पोलीस स्टेशनचे हे. कॉ. गोपाल पोपट गव्हाळे व पो. कॉ. सचिन पोळ यांनी घटनास्थळी सापळा रचून संशयित वाहनाला थांबवून पाहणी केली. त्यामध्ये तंबाखूजन्य केसर युक्त सुगंधित पान मसाला सह चारचाकी वाहन मिळून आल्याने पोलिसांनी आरोपीकडून एकूण 4 लाख 36 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
याबाबत, बाजारपेठ पोलीसात पो. काँ. सचिन पोळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास गोपाल गव्हाळे करीत आहे.