सिंधी कॉलनीतुन आठ लाखांचा गुटखा जप्त

पोलीस उपअधिकक्षांच्या पथकाची कारवाई; कारवाईमुळे शहरात खळबळ
Breaking news
Breaking news Breaking news

जळगाव jalgaon

शहरातील सिंधी कॉलनीमधील (Sindhi Colony) गोडाऊनमध्ये (godown) सुगंधित पान मसाला, तंबाखू व गुटखा (Fragrant pan masala, tobacco and gutkha) याची साठवणूक करून त्याची बेकायदेशीर विक्री (Illegal sale) करणाऱ्या गोडाऊनवर सहायक पोलीस अधीक्षकांच्या (Assistant Superintendents of Police) पथकाने (team) शनिवारी दुपारच्या सुमारास छापा (raided) मारला. या कारवाईत ७ लाख ८२ हजार रुपये किमतीचा गुटखा आणि ४ लाख ६७ हजार रुपयांची रोकड असा एकूण १२ लाख ४९ हजार (Worth 12 lakh 49 thousand rupees) रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त (Confiscation of goods) केला. या कारवाईमुळे शहरातील गुटखामाफियामध्ये खळबळ (Excitement in Gutkhamafia) माजली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सिंधी कॉलनी येथील भाजीपाला मार्केटजवळील एका मार्केट मधील गोडाऊनमध्ये बेकायदेशीर रित्या गुटखा, तंबाखू व सुगंधित पान मसाल्याची साठवणूक करून विक्री होत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना मिळाली. त्यानुसार शनिवार १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने पथकाने गोडावून वर छापा टाकला.  यामध्ये पोलिसांनी ४ लाख ६७ हजार रुपयांची रोकड व ७ लाख ८२ हजार रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा असा मुद्देमाल असा एकूण १२ लाख ४९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

 या कारवाईनंतर पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्या फिर्यादीवरून सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रमेश जेठानंद चेतवाणी, दीपक रमेश चेतवाणी आणि सिमरन रमेश चेतवाणी तिघे राहणार कंवर नगर, सिंधी कॉलनी, जळगाव यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

या पथकाची कारवाई

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोउनि सुनील पाटील, प्रदीप बोरुडे, प्रमोद कठोरे, सहायक फौजदार विनयकुमार देसले, पोहेकॉ किरण धमके, सुहास पाटील, महिला पोलीस कर्मचारी मीनल साखळीकर, पोलीस नाईक महेश महाले, रवींद्र मोतीराया, निलेश पाटी,  योगेश सपकाळे, अशोक फुसे, गोपाल पाटील, सचिन साळुंखे, महेश पवार, भास्कर ठाकरे यांच्या पथकाने केली.

कारवाईमुळे शहरात खळबळ

पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी केलेल्या कारवाईमुळे शहरातील गुटखा विक्री कणाऱ्यामध्ये खळबळ माजली असून त्यांचे धाबे दणाणून गेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com