भुसावळात दोन कोटी 27 लाखांचा गुटखा जप्त

तालुका पोलिसात पाच जणांवरुद्ध गुन्हा दाखल : एक ताब्यात अन्य पसार
भुसावळात दोन कोटी 27 लाखांचा गुटखा जप्त

भुसावळ Bhusawal । प्रतिनिधी

राजस्थानातून (Rajasthan) जळगावकडे (Jalgaon) जाणारा तीन कंटेनर (Three containers) गुटख्याचा साठा (Gutkha stock) डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे (DYSP Somnath Waghchaure) यांनी पथकासोबत पकडला.

कारवाईत 2 कोटी 27 लाख रुपयांचा गुटखा, 1 कोटी 23 लाख रुपये किमतीचे तीन कंटेनर असा एकूण साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त (Seizure of property) केला आहे. या प्रकरणी एकास अटक केली असून, अन्य कंटेनरचालक पसार झाले आहेत.

मिळावलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल रोजी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना गुटख्याच्या वाहतुकीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे वाघचौरे यांनी स्वत: भुसावळ-साकेगाव दरम्यान पाहणी केली. यावेळी साकेगावजवळील पेट्रोल पंपावर (petrol pump) तीन कंटेनर उभे असलेले दिसले. या वेळी पोलिस ताफा कंटेनरकडे वळताच कंटेनरचालक पसार झाले. मात्र, एका संशयिताला पकडण्यात (apprehending the suspect) पोलिसांना यश आले. तिन्ही कंटेनर डीवायएसपी कार्यालयाच्या आवारात पंचनामा (Panchnama) करून जमा केले आहेत. या गुटखा(Gutkha) नेमका कुणाचा याचा शोध सुरु आहे. या प्रकरणातील तिन्ही कंटेनरचालकांना ऐनवेळी मोबाइलवर सूचना मिळत होत्या. त्यामुळे कंटेनर कुठे जाणार होते. याची माहिती निष्पन्न झालेली नाही. पोलिसांच्या ताब्यातील संशयितालाही त्याबाबत माहिती नाही. सूचना मिळाल्यानुसार कंटेनर मार्गस्थ केले जात होते, अशी माहिती समोर आली आहे.

याबाबत तालुका पोलिसात (police) अन्न सुरक्षा अधिकारी (Food Safety Officer) किशोर साळुखे, यांच्या फिर्यादीवरुन गुरनं. अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 नियम व नियमन 2011 नुसार, भादंवि. 328, 272, 273, 179, 188, 34 प्रमाणे

तोहसीफ अहमद अब्दुल हमीद (वय 27, घोसंडा ता, महु. जि. मेवात, हरियाणा) , सलिम नसीर निसार व एक क्लिनर (नाव माहित नाही)(रा. कोटा, राजस्थान) तसेच गाडी मालक साहुन (पूर्ण नाव माहित नाही. ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन तोहसीफ अहमद अब्दुल हमीद याला ताब्यात घेण्यात आले तर अन्य पसार झाले. तपास सपोनि अमोल पवार करित आहे.

Related Stories

No stories found.