गुलाल आमचाच!

विधानपरिषद निवडणुकीवर जिल्ह्यातील नेत्यांचे दावे- प्रतिदावे
गुलाल आमचाच!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

विधानपरिषदेच्या (Legislative Council) 10 जागांसाठी (10 seats) उद्या दि. 20 रोजी निवडणूक (Election) होत आहे. या निवडणूकीला जिल्ह्यातील आमदारही मतदार आहेत. जळगाव जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे (NCP leader Eknathrao Khadse) हे उमेदवार (candidate) आहेत. काँग्रेसने (Congress) सहा तर भाजपने (BJP) पाच उमेदवार देवून या निवडणुकीत रंगत आणली आहे. दरम्यान, या निवडणुकीत गुलाल आमचाच (Gulal is ours) राहणार असल्याचे दावे-प्रतिदावे (Claims-Counterclaims) जिल्ह्यातील भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी (Leaders of Mahavikas Aghadi) केले आहे.

नुकतीच राज्यसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीत भाजपने (bjp) शिवसेना (Shiv Sena) उमेदवाराचा पराभव करुन धनंजय महाडीक यांच्या रुपाने आपला तिसरा उमेदवार निवडुन आणत महाविकास आघाडीला धक्का दिला होता. या पराभवामुळे महाविकास आघाडीत अंतर्गत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उद्या दि. 20 रोजी विधानपरिषदेच्या (Legislative Council) 10 जागांसाठी निवडणुक होणार असून, 11 उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादीकडून एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून एकनाथराव खडसे यांचा विधीमंडळात प्रवेश होवू नये म्हणून पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेच्याही निवडणुकीत महाविकास आघाडीला दे धक्का देण्याची तयारी भाजपने केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील एकनाथराव खडसे यांना निवडुन आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्यावर जबाबदारी टाकली आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील 11 आमदार देखील या निवडणुकीसाठी मतदार असून, या निवडणुकीत ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी सर्व आमदार शनिवारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. तसेच विधानपरिषदेच्या या निवडणुकीत ‘गुलाल आमचाच’ राहणार असल्याचा दावे-प्रतिदावे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे. उद्याच्या निकालासाठी भाजप आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

जिंकण्यासाठीच उमेदवारी

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर आणि एकनाथराव खडसे या दोघांना उमेदवारी दिली आहे. जिंकण्यासाठीच ही उमेदवारी दिली असून, पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह ना.अजित पवार, प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी ही निवडणुक अत्यंत गांर्भियाने घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत विजय आमचाच होणार आहे.

-अ‍ॅड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष रा.काँ.

भाजपाचे खास प्लॅनिंग

राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेची निवडणुकही भारतीय जनता पार्टी जिंकण्यासाठीच लढत आहे. विधानपरिषदेच्या या निवडणुकीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ना.प्रविण दरेकर, आ.गिरीश महाजन, आ.आशिष शेलार यांनी खास प्लॅनिंग केले आहे. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेतही आमचे पाचही उमेदवार निवडुन येतील.

-आ.राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष भाजप

विजयासाठी सुक्ष्म नियोजन

विधानपरिषदेच्या या निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडुन आणण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील आणि प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी सुक्ष्म नियोजन केले आहे. काँग्रेसचे सर्व उमेदवार या निवडणुकीत निश्चितपणे विजयी होतील आणि गुलाल आम्हीच उधळू.

-डॉ.उल्हास पाटील, प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस

आघाडी धर्म पाळणार

विधानपरिषदेच्या या निवडणुकीत शिवसेनेविषयी संभ्रम निर्माण केला जात आहे. मात्र, राज्यसभेप्रमाणे गाफील न राहता, या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडुन आणण्यासाठी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही आघाडीधर्म पाळणार आहोत.

-विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com