गुलाबराव पाटलांनी उध्दव ठाकरेंना दिला हा सल्ला...!

गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील

जळगाव - jalgaon

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी धरणगाव (dharangaon) येथे प्रबोधन सभा घेऊन शिंदे गटावर (Shinde group) चौफेर टीका केली. यातही गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांच्यावर अंधारे यांनी सडकून टीका केली. मी तुम्हाला सळो की पळो करून सोडणार, आज तुम्हाला झोप येणार नाही, असा इशाराच त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना दिला. यानंतर आता गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन सभा ही जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणारी आहे. सुषमा अंधारे या राष्ट्रवादीचे प्रॉडक्ट आहे, अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. उरली सोडलेली शिवसेना डॅमेज करण्यासाठी राष्ट्रवादीकडून सुषमा अंधारे हे पार्सल इकडे आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या या पार्सल पासून सावध रहावे. राष्ट्रवादीचे हे पार्सल तुमच्या पक्षाला डब्यात नेल्याशिवाय राहणार नाही, अशी जोरदार टीका गुलाबराव पाटील यांनी केली.

गुलाबराव पाटील
Visual Story प्राजक्ताच्या या हटके फोटोशूटने केले घायाळ...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com