
जळगाव - jalgaon
जिल्हा बँकेच्या चेअरमन व व्हाइस चेअरमन पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली. त्या पूर्वी महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत चेअरमन पदासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर तर व्हाइस चेअरमन पदासाठी शिवसेनेचे श्यामकांत सोनवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
दोघ उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल केले असून लवकरच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.